परभणी प्रकरणात पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांच्यावर निलंबनाची कारवाई ;मुख्यमंत्री फडणवीस

Police Inspector Ashok Ghorbad questioned in Parbhani case; Chief Minister Fadnavis

 

 

 

परभणीतील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ काही दिवसांपूर्वी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते.

 

बंदचे आवाहन करत असंख्य युवक रस्त्यावर आल्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागात तणाव निर्माण झाला. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली.

 

दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिल्यानतंर परिस्थिती निवळली होती. यानंतर पोलिसांकडून कोबिंग ऑपरेशन झाल्याचे म्हटले जात होते.

 

यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले आहे.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि मला बाळासाहेबांनी सांगितलं की, मला माहिती आहे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. मी तात्काळ पोलिसांशी बोललो त्यांना विचारलं कसलं ऑपरेशन सुरू आहे?

 

तर पोलीस म्हणाले व्हिडिओमध्ये दिसताय त्यांना आम्ही पकडतोय. मी त्यांना सांगितलं त्याचा संदेश चांगला जात नाही. त्यानंतर पोलीस महानिरीक्षक, माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं.

 

सहा वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही. सहा वाजल्यानंतर कोणाला अटकही केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले हे सांगणं योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

 

ते पुढे म्हणाले की, त्यामध्ये एक तक्रार आलेली आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला. निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होईपर्यंत अशोक घोरपडे यांना निलंबित केला जाईल.

 

त्यांना निलंबित करून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यांनी अधिक बळाचा वापर केला आहे का? याची चौकशी होणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी हे आंदोलक आहेत. ते कायद्याचे शिक्षण घेत होते. ⁠ते मुळ लातूरचे आहेत. ⁠परभणीत शिक्षण घेत होते. ⁠

 

सुर्यवंशी यांना जाळपोळ करणार्‍यांमध्ये अटक करण्यात आली. ⁠त्यांना दोनवेळा मॅजेस्टिकच्या समोर ठेवलं. पोलिसांनी मारहाण केल्याची विचारणा केली.

 

त्यावेळी त्यांनी नाही म्हणून सांगितले. त्यांना ⁠श्वसनाचा आजार आहे, अस मेडीकल रिपोर्टमध्ये आहे. त्यांचे ⁠एका खाद्यांचे हाड तुटल्याचे ही सांगण्यात आले. त्याना जळजळतय म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, त्यावेळी त्यांना मृत घोषित केले.

 

परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू बाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. सोमनाथ सुर्यवंशी हे कायद्याचं शिक्षण घेत होते.

 

त्यांना जाळपोळीच्या घटनेत अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना कोठडीत मारहाण झालेली नाही. त्यांना श्वसनाचा आजार होता असं अहवालात नमूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

आता या दोन्ही प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सूर्यवंशीने स्वतःला मारून घेतले का? जर पूर्वीच्या जखमा असत्या तर तसे आले असते ना? मल्टीपल इंज्युरी झाल्या कश्या आणि कुठे? सूर्यवंशींचा मृत्यू कसा झाला? मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने निवेदन दिले नाही.

 

पोलिसांनी रस्त्यावर ज्या प्रकारे आंदोलकांना मारले त्याचे व्हिडिओज आहेत. पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचा काम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केले.

 

पण बारा कोटी लोकांना हे अपेक्षित होते ते न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केलेले नाही. आजही त्या व्यक्तीवर आणि परभणीकरांवर अन्याय झाला आहे. सोमनाथ सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिलेला नाही.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या घटनेसंदर्भात निवेदन देताना या संपूर्ण घटनेची माहिती सभागृहात दिली. परभणीत झालेल्या तोडफोडीत तब्बल १ कोटी ८९ लाख ५४ हजारांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यंत्र्यांनी सभागृहात सांगितली.

 

तसेच या प्रकरणात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवी पेक्षा जास्त बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

यावरून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचं निलंबन करण्यात आल्याची माहितीही फडणवीसांनी दिली. तसेच कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून १० लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

 

“परभणीतील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, “ही घटना घडल्यानंतर काही संघटनांनी ११ डिसेंबर रोजी बंद पुकारला होता. हा बंद शांततेत पार पडावा म्हणून पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेतली होती.

 

या बैठकीला ७० ते ८० विविध संघटनांचे कार्यकर्ते हजर होते. त्यानंतर काही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले होते.

 

मात्र, त्यानंतर परभणीतील गंगाखेड रोडसह काही ठिकाणी आधी टॉवर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर अचानक ३०० ते ४०० आंदोलक जमा झाले.

 

काही लोकांनी त्या ठिकाणी तोडफोड केली. त्या ठिकाणी जमावाने बंद असलेल्या दुकानांची देखील तोडफोड केली. काही गाड्या जाळण्यात आल्या.

 

मात्र, त्यानंतर पोलिसांनी जमावबंदी लागू केली. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचं पाहून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत लाठीचार्ज केला”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

 

“काही महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश करत काचा फोडल्या, खुर्च्या फोडल्या. मात्र, त्यानंतर सीआरपीएफची जास्त तुकडी मागवण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

 

या घटनेतील ५१ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामध्ये ४१ व्यक्तींना तीन गुन्ह्यांत अटक करण्यात आली. तसेच महिलांना अटक करण्यात आलेली नाही.

 

त्यांना फक्त नोटीस देऊन सोडून देण्यात आलं. सायंकाळी ६ नंतर कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही. काही व्हिडीओमध्ये जे दुकानांची तोडफोड करताना दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे”, असंही फडणवीसांनी सांगितलं.

 

“परभणीतील घटनेतील आरोपी हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर २०१२ पासून उपचार सुरु आहेत. मात्र, तरीही तो आरोपी खरंच मनोरुग्ण आहे की नाही त्यासाठी ४ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली होती.

 

त्यांनी त्याची तपासणी केली. दरम्यान, या संपूर्ण घटनेत सर्वसामान्य लोकांचं जवळपास एक कोटी ८९ लाख ५४ हजारांचं नुकसान झालं”, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात सांगितली.

“या घटनेत काहींनी कोंबिंग ऑपरेशन केल्याचा आरोप केला. मात्र, यामध्ये कुठेही कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलेलं नाही. तसेच एक तक्रार दाखल झाली होती की,

 

तेथील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवी पेक्षा जास्त बळाचा वापर केला. या आरोपानंतर चौकशी केली जाईल,

 

तसेच चौकशी होईपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबीत करण्यात आलं आहे”, असं फडणवीसांनी सांगितलं.

 

या घटनेत पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यांच्याबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “सोमनाथ सुर्यवंशी हे कायद्याचं शिक्षण घेत होते.

 

त्यांना जाळपोळीच्या घटनेत अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना कोठडीत मारहाण झालेली नाही. त्यांना श्वसनाचा आजार होता असं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे.

 

मात्र, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून १० लाखांची मदत देण्यात येणार आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *