अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा ; अभिताभ बच्चनला सतावतेय ही चिंता
Abhishek-Aishwarya's divorce talks; This worry is haunting Abhithab Bachchan
गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. हसत्या खेळत्या बच्चन कुटुंबियात दरी पडल्याची चर्चा आहे.
ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबात काहीतरी बिनसलं असल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जातंय.
मात्र, यावर ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या सगळ्या दरम्यान अमिताभ यांनी त्यांच्या नवीन ब्लॉगमध्ये आयुष्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
या ब्लॉगमध्ये त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती 16’ मध्ये येणाऱ्या स्पर्धकांच्या संघर्षाचाही उल्लेख केला आहे. नक्की काय म्हणाले अमिताभ बच्चन जाणून घ्या.
‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर आणि त्याच्या हॉटसीटवर बसण्याचा संघर्ष सांगितला आहे. त्यांनी या ब्लॉगमध्ये ‘कौन बनेगा करोडपती’च्या शुटिंगवरून परतल्यावर काय भावना असतात हे सांगितलं,
तसंच ते हॉट सीटवर बसलेल्या काही स्पर्धकांच्या हृदयस्पर्शी कथा ऐकून, त्यांच्या आयुष्यात अडचणी आणि संघर्ष असूनही स्पर्धक नेहमी हसतमुखाने हॉटसीटवर बसतात असा खुलासा केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय की, “गेममध्ये काही नवीन आणि मनोरंजक बदल झाले आहेत. याचा काय परिणाम होईल आणि काय शिकता येईल माहिती नाही…
पण सगळ्यात जास्त म्हणजे जेव्हा हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धक त्याच्या आयुष्यातील गोष्टी सांगतात… ते ज्या कठीण परिस्थितीत राहतात
आणि त्यांनी वर्षानुवर्षे सहन केलेला त्रास… एवढं असतानाही जेव्हा ते अचानक ते हॉटसीटवर बसतात तेव्हा ते किती आनंदी होतात तो क्षण खूप महत्वाचा असतो…”
अमिताभ बच्चन यांनी पुढे म्हटलंय की, ‘‘हे खूप हृदयस्पर्शी आहे…या स्त्री-पुरुषांच्या जीवनाची स्थिती पाहून मला खूप असहाय्य वाटतं. ते लाखो लोकांसमोर येतात,
त्यांची धडपड सगळ्यांसमोर येते… पण त्यांचं गोड हास्य पाहून सगळेच विरघळतात. गेल्या काही दिवसांपासून मी अनेक स्पर्धकांच्या खूप हृदयस्पर्शी कथा ऐकत आहे.’’
अमिताभ बच्चन यांनी पुढे म्हटलंय की, ‘‘आम्ही त्यांच्या वागण्या-बोलण्याने हरखून जातो… आणि त्यांच्या गरजांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा आणि त्यांचं कठीण जीवनातील कष्ट कमी करण्याचा प्रयत्न करतो…” अमिताभ यांचा हा ब्लॉग व्हायरल होत आहे.