नाना भाजपात जाणार?,मोदींची केली तोंडभरून स्तुती;लोकसभेत किती जागा आकडाही सांगितला
Nana will join BJP, praises Modi; also tells how many seats in Lok Sabha

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे नेहमीच त्यांच्या आक्रमक आणि परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. कुणाला काय वाटेल या भीतीपोटी नाना कधीही बोलत नाही.
आपल्याला जे योग्य वाटेल ते मोठ्या हिंमतीनं बोलणाऱ्या नानांनी पुन्हा एकदा एक राजकीय वक्तव्य करुन लक्ष वेधून घेतले आहे.
या वर्षी नानांचा द व्हॅक्सीन वॉर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या त्या चित्रपटामध्ये नानांनी साकारलेल्या शास्त्रज्ञाच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी, चाहत्यांनी कौतुकही केले होते.
त्यानंतर नाना प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याचे दिसून आले होते. याच चित्रपटातील एका दृश्याचे चित्रिकरण सुरु असताना झालेल्या प्रकारानं नाना ट्रोल झाले होते.
त्या व्हिडिओमुळे नानांना दिलगिरी देखील व्यक्त करावी लागली होती. आता नानांनी आगामी काळातील निवडणूका आणि राजकीय परिस्थिती यावर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
यावेळी नानांनी कोणता पक्ष निवडून येणार आणि कोण पंतप्रधान होणार याविषयी भाष्य केलं आहे. त्या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नाना काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.
झी बिझनेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नानांना आगामी काळातील निवडणूकांविषयी विचारण्यात आले. नाना तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष पुन्हा सत्तेवर असेल, कोण जिंकेल,
या प्रश्नावर नानांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. नाना म्हणाले, मला वाटतं बीजेपी पुन्हा एक मोठा विजय संपादन करेल. २०२४ च्या निवडणूकीमध्ये त्यांची सरशी होईल.
बीजेपीला किती जागा मिळतील यावर नाना म्हणाले ३७५ ते ४०० जागा बीजेपीला मिळतील. तुम्ही किती मोठ्या फरकानं बीजेपी पक्ष पुन्हा सत्तेवर येतो ते… त्याचं दुसरं एक कारण म्हणजे
आपल्याकडे बीजेपीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच दिसतील. असेही नानांनी यावेळी सांगितले.
नानांच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अनेकांनी नानांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे तर कित्येकांनी नानांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.