लोकप्रिय स्टार्सच्या यादीत शाहरुखच ‘बाहशाह’!

In the list of popular stars, Shah Rukh is 'Bahshah'! ​

 

 

 

 

IMDb ह्या चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी कंटेंटवरील जगातल्या सर्वात प्रसिद्ध आणि अधिकृत स्रोत्राने 2023 च्या सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची घोषणा केली आहे. IMDb ने या वर्षातील टॉप इंडियन स्टार्सची यादी जाहिर केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

या यादित बॉलिवूडसह टॉलिवूड कलाकारांचा देखील सामावेश करण्यात आला आहे. या यादीत प्रथम क्रमांक पटकावणारा अभिनेता ठरला आहे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान. यादीनुसार किंग खान या वर्षातील टॉप भारतीय अभिनेता बनला आहे.

 

 

 

IMDb च्‍या 2023 च्‍या टॉप 10 सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्‍टार्सच्‍या यादीमध्‍ये अशा कलाकरांचा समावेश होतो, जे 2023 च्‍या कालावधीत सतत IMDb रँकिंगमध्‍ये सर्वोच्च रँकवर असतात.

 

 

 

1. शाहरुख खान

2. आलिया भट्ट

3. दीपिका पदुकोण

 

 

 

 

4. वामिका गब्बी

5. नयनतारा

6. तमन्ना भाटिया

 

 

 

 

7. करीना कपूर खान

8. शोभिता धुलिपाला

9. अक्षय कुमार

 

 

 

 

10. विजय सेतुपती

 

 

 

शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमुळे या यादित अव्वल स्थानी आहे. तर दुसरा क्रमांक आलिया भट्टने पटकावला आहे. या वर्षी तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि हॉलिवूडचा ‘हार्ट ऑफ स्टोन’ हे दोन सिनेमे रिलिज झाले होते.

 

 

 

तर दीपिका पदुकोणने तिसरे स्थान मिळवले आहे. तर या यादीत अभिनेत्री वामिका गब्बी चौथ्या क्रमांकावर आणि शाहरुखच्या जवानमध्ये दिसलेली अभिनेत्री नयनताराने पाचव्या क्रमांकावर आहे

 

 

 

तर यावेळी तमन्ना भाटियाने सहावे स्थान पटकावले आहे. तर करीना कपूर खान 7 व्या आणि शोभिता धुलिपाला 8 व्या स्थानावर आहे. या यादित बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा 9 व्या नंबरवर आहे. तर शेवटी साउथस्टार विजय सेतुपती आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *