महाराष्ट्रातील “या” भाजप उमेदवारावर नाराजी ; पदाधिकाऱ्यांचे राजीनामे;भाजपमध्ये खळबळ

Displeasure with this BJP candidate in Maharashtra; Resignation of office bearers; Excitement in BJP

 

 

 

 

 

ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने भाजपच्या

 

 

 

 

पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. नवी मुंबई पाठोपाठ मिरा-भाईंदर भाजपच्या सजीव नाईक समर्थक पदाधिकाऱ्यांनी पदाचे गुरुवारी राजीनामे दिले आहेत.

 

 

 

ठाणे लोकसभेची जागा महायुतीत शिवसेनेला न सोडता भाजप लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. त्याची माळ संजीव नाईक यांच्या गळ्यात पडणार असल्याचे म्हटले जात होते.

 

 

 

नाईक यांनी मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीगाठी देखील सुरू केल्या होत्या. ह्यातच बुधवारी शिवसेनेने ही जागा स्वतःकडे राखत, नरेश मस्केंची उमेदवारी जाहीर केली आहे.

 

 

 

 

त्यानंतर नाईक यांना उमेदवारी न दिल्याने मिरा-भाईंदर भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. याच कारणास्तव नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी राजीनामे दिले आहेत.

 

 

त्या पाठोपाठ मिरा-भाईंदर भाजपच्या वरिष्ठ काही पदाधिकाऱ्यांनी ही पदाचे राजीनामे दिले आहेत. ह्यात माजी नगरसेवक तथा महासचिव ध्रुवकिशोर पाटील,

 

 

 

 

अल्पसंख्यक विभाग उपाध्यक्ष एजाज खातिब, युवा मोर्चा महासचिव विशाल पाटील आणि जिल्हा सरचिटणीस दयानंद शिर्के आदींचा समावेश आहे.

 

 

 

यासह इतरही अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी अद्यापही वेळ आहे.

 

 

 

 

त्यामुळे आताच उमेदवार बदलण्यात यावा, अशी मागणी ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून समाज माध्यमांवर केली जात आहे.

 

 

 

 

मिरा-भाईंदर मधील भाजपची मोठी ताकद लक्षात घेता कार्यकर्त्यांमधील नाराजी मस्केंना महाग पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *