महाराष्ट्रातील भाजपचे 13 खासदार डेंजरझोनमध्ये ;या खासदारांची उमेदवारीच्या चिंतेने झोप उडाली
13 MPs of BJP in Maharashtra in danger zone; these MPs lost sleep with the worry of candidacy
महायुतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार याची चर्चा सुरू असताना, आता भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक चांगलीच वाढलीय. भाजप पक्षाकडून राज्यातील विद्यमान खासदारांचे पक्षअंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले आहेत.
ज्यात डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला नाही, त्या खासदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली हाच निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला आहे.
येत्या दोन दिवसांत भाजपची जी उमेदवारांची यादी येण्याची शक्यता आहे, त्यामध्ये डझनभर नवीन नावं दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
नेहमीप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपकडून धक्कातंत्र वापरल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना धक्का बसणार आहे.
पुढील दोन-तीन दिवसांत दिल्लीतून भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र, या यादीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून, तब्बल डझनभर विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे.
भाजपकडून पक्षाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेत राज्यातील डझनभर विद्यमान खासदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन लोकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
सामाजिक समिकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता,
3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे.
राज्यातील भाजपच्या सर्वच विद्यमान खासदारांचे पक्षाकडून तीन सर्व्हे करण्यात आले आहेत. ज्यात डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे.
सोबतच काहींना पक्षातून विरोध आहे, काहींची कामगिरी समाधानकारक नाही, काही ठिकाणी सामाजिक समिकरणांमुळे निवडून येण्याची शक्यता कमी आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून या डझनभर विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक खासदारांची धाकधूक वाढली आहे.
खालील जागांवरील उमेदवार बदलाची दाट शक्यता :-बीड,धुळे,सोलापूर,सांगली,लातूर,जळगांव,उत्तर मुंबई,उत्तर मध्य,मुंबई,नांदेड,अहमदनगर,धुळे,वर्धा,रावेर