हायकोर्टानं का केली अकोला येथील निवडणूक रद्द
Why did the High Court cancel the election in Akola?

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकताच जाहीर केला, त्याचबरोबर देशभरातील काही पोटनिवडणुकांच्या
निवडणुकाही जाहीर करण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रात अकोला पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांच निधन झाल्यानं ही जागा रिक्त झाली होती.
या जागेवरही पोटनिवडणूक लागली होती, पण आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ही निवडणूक रद्द ठरवली आहे.
महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला आता एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळ बाकी शिल्लक आहे.
त्याचबरोबर जर महाराष्ट्रात पोटनिवडणूक झाली तर त्याचा निकाल हा ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर केवळ चारच महिन्यांचा कार्यकाळ तिथं निवडणून आलेल्या आमदाराला मिळू शकतो.
पण यासाठी निवडणूक खर्च करणं आणि सुरक्षा यंत्रणा राबवणं हे निरर्थक असल्यानं ही पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी यासाठी नागपूर खंडपीठामध्ये शिवकुमार दुबे यांनी याचिका दाखल केली होती.
दरम्यान, 26 एप्रिल रोजी अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी मतदान पार पडणार होतं. ज्याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार होता. त्यामुळं खंडपीठानं या पोटनिवडणुकीची अधिसूचना रद्द केली आहे.