इज्तेमामध्ये उभारण्यात आलेल्या रुग्णालयात होत आहे हजारो रुग्णांची सेवा

Thousands of patients are being served in the hospital built during Ijtema

 

 

इजतेमातील रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लखमवार यांनी भेट दिली यावेळी रुग्णालयात देण्यात येत असलेल्या सेवेबाबत डॉ. रफिक शेख यांनी त्यांना माहिती दिली

 

 

 

परभणी येथे दोन दिवसीय इज्तेमा मध्ये उभारण्यात आलेल्या रुग्णालयात हजारो रुग्ण उपचार घेत आहेत.

 

लाखोंच्या जनसमुदायांची आरोग्य सेवा करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे विविध आजारांनी त्रस्त रुग्णांना इज्तेमामध्ये उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाचा मोठा फायदा होत आहे.

 

परभणी येथील जिंतूर रोडवर दोन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या इजतेमामध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील लाखो मुस्लिम भाविक इज्तेमामध्ये सहभागी झाले आहेत.

 

मध्येमामध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी आरोग्याच्या सुविधा व्हावी या उद्देशाने रुग्णालय उभारण्यात आले आहे.

 

मातोश्री नर्सिंग महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. रफिक शेख यांच्या व्यवस्थापनात हे रुग्णालय कार्यरत आहे.

रुग्णालयात हजारो रुग्णांना औषधोपचार करण्यात येत आहे,विविध साथीचे रोग,थंडी ताप यासारख्या साथीच्या रोगाबाबरोबरच गंभीर आजार,

 

अपघात ,तसेच अत्यावस्थ रुग्णांसाठी रुग्णालयात आयसीयू उभारण्यात आले आहे. रुग्णायात शेकडो डॉक्टर दिवसरात्र रुग्णांची सेवा बजावत आहे..

 

रुणालयात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून मोफत औषधी देण्यात येत आहेत . रुग्णायात व्हेंटिलेटर,ऑक्सिजनचीही सुविधा आहे .

 

अत्यवस्थ रुग्णांना तात्काळ शहरातील हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यासाठी चार ऍम्ब्युलन्स तैनात आहेत.

 

असे सांगून समाजसेवा हेच एकमात्र ध्येय नजरेसमोर ठेऊन आम्ही ऋणांची सेवा करत असल्याचे व्यवस्थापक डॉ. रफिक शेख यांनी यावेळी सांगितले.

 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लखमवार  यांनी रुग्णालयाला भेट देऊन सुरु असलेल्या रुंसेवेची माहिती घेऊन सुरु असलेल्या कामाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *