भाजप शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेऊन केल्या “या” मागण्या

The BJP delegation met the Central Election Commission and made these demands

 

 

 

भाजपच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यात सुधारणा करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने चर्चा केली आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत अनेक नावे गहाळ झाली होती आणि त्याचा भाजपला फटका बसला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, किरीट सोमय्या, अनुप धोत्रे, हेमंत सावरा,

 

 

आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीतील महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे.

 

केंद्रीय निवडणूक आयोगाची आम्ही आज जवळपास सव्वा तास भेट घेतली. महाराष्ट्रातील बूथ आणि मतदार यादी त्यांनी समजून घेतलं.

 

एका लोकसभा मतदार संघात दीड लाख मत 2019 ला होते मात्र ते 2024 ला नाहीत. नागपूरचं उदाहरण आम्ही त्यांना दिलं. डेटा एन्ट्रीची परिस्थिती आम्ही त्यांना समजून सांगितली, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

 

 

मतदार यादी ही एका बूथ ची 1 हजार च्या आत करावी अशी विनंती आम्ही केली. वयोवृद्ध मतदार यांचं वय 85 वरून 75 वर्ष करावं अशी विनंती केली. हाउसिंग सोसायटी मधे 100 टक्के बूथ लावण्याची मागणी केली.

 

एकाच इमारतीत 2 बूथ करायचे असतील तर शेजारी शेजारी बूथ लावण्याची आम्ही विनंती केली. आम्हाला वाईट अनुभव आले होते ते पुन्हा येऊ नये

 

 

यासाठी 11 मुद्यावर आम्ही चर्चा केली. निवडणूक आयोगाकडून आम्हाला अपेक्षा आहे की निवडणूक चांगली होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

2024 ला गाळलेल्या नावांचा रिव्ह्यू केला पाहिजे. अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली. काही ठिकाणी मतदार यादीत परिवार तुटले आहेत त्यांना एकत्र मतदान करण्याची संधी मिळावी, ही मागणी केलीय.

 

त्यांच्या बोलण्यावरून अस दिसतंय की बूथ लेव्हलच्या अधिकाऱ्यांकडून चुका झाल्याचं दिसतं. महाराष्ट्रात 10 टक्के लोकांना

 

 

मतदान करता आलं नाही. फोटो नसल्यामुळे अनेकांना मतदान करता आलं नाही, असं आशिष शेलार यावेळी म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *