पवारांच्या ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या
Two cars in Pawar's convoy collided with each other

शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेल्या
शरद पवारांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. यावल तालुक्यात भुसावळ-यावल रस्त्यावर हा अपघात घडला आहे.
शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चोपडा येथील सभा आटोपून ते भुसावळकडे जात असताना हा अपघात घडला आहे.
भुसावळकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या समोर गतीरोधक आल्याने वाहन चालकाने वाहनाची गती कमी केली. मात्र मागील येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज न आल्याने
ताफ्यातील शेवटी येत असलेल्या एका वाहनाने समोरील वाहनास धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचं नुकसान झालं आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.