अजित दादा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून मुंबईत, वर्षा बंगल्यावर रात्री 11 वाजता मोठ्या घडामोडी
Ajit Dada left the program halfway through Mumbai, big events at Varsha Bangla at 11 pm
उपमुख्यमंत्री अजित पवार जन सन्मान यात्रा मध्येच सोडून तडकाफडकी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत पोहोचता अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले .
थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. अजित पवार जन सन्मान यात्रा सोडून तडकाफडकी बैठकीसाठी मुंबईत आले ,
त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. आचारसंहितेपूर्वी विकासकामांच्या पूर्ततेसाठी, राज्यसभेच्या जागा संदर्भात आणि इतर विषयावर बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे.
नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघातून त्यांनी आपली यात्रा सुरू केली असून महिला भगिनींसह कार्यकर्त्यानीही त्यांचं जंगी स्वागत केलं.
यावेळी, भाषण करताना अजित पवारांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण लाडकी बहीण योजना राबवत असल्याचे सांगत,
रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये पहिला हफ्ता जमा होणार असून मी कालच 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही केल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, यानंतर अजित पवार तडकाफडकी मुंबईला रवाना झाले होते.
मुंबईत महायुतीने गुरुवारी मध्यरात्री बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षाची बैठक झाली.
सुमारे अडीच तास तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत खलबते झाले. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा रणनीती निश्चित करण्यात आली.
तिन्ही पक्षाकडून सामूहिक सभा, दौरे आणि मेळावे घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग येत्या २० ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथून फुंकण्यात येणार आहे.
वर्षा बंगल्यावरील बैठक गुरुवारी रात्री ११ ते १.३० पर्यंत सुरु होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरल्याची माहिती मिळाली आहे.
मेळावे, सभा आणि संवाद दौरे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक मतदार संघावर लक्ष ठेऊन रणनीती तयार केली जाणार आहे. येत्या २० तारखेपासून तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहे.
मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी मा उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व मा अजितदादा पवार यांच्या उपस्तितीत महायुती समन्वयाची बैठक संपन्न झाली .
सदर बैठकीत ७ विभागात व २८८ विधानसभेत एकाच दिवशी विभागनिहाय महायुतीतील सर्व घटक पक्ष संवाद / लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करतील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार रात्री ११ वाजता पोहचले. त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु झाली.
या बैठकीत ७ विभाग आणि २८८ विधानसभेत एकाच दिवशी विभागनिहाय संवाद दौरे, लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करण्याबाबत निर्णय झाला.
तसेच ७ विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार आहेत. २० ऑगस्ट रोजी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापूर येथून जाहीर सभेने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकंले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच झटका बसला होता. या निवडणुकीत महायुतीला ४८ पैकी केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला होता.
महाविकास आघाडीने ३० जागा आणि महाविकास आघाडीतील बंडखोर अशा ३१ जागांवर वर्चस्व निर्माण केले होते. त्यामुळे आता महायुतीने अधिक जोराने काम सुरु केले आहे.