उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा ; आदित्यला मुख्यमंत्री करायचंय

Uddhav Thackeray's big announcement; Aditya wants to become Chief Minister

 

 

 

 

 

 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

 

 

उद्धव ठाकरे यांना आपला मुलगा आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचं आहे, असं अमित शाह म्हणाले. त्यांच्या याच टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेत प्रत्युत्तर दिलं.

 

 

 

धाराशिवमध्ये आज ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. “हो मला करायचे आहे आदित्यला मुख्यमंत्री. पण त्यासाठी त्याला तुम्ही (नागरिकांनी) निवडून दिले पाहिजे.

 

 

 

जय शाहचे क्रिकेटचे काय योगदान आहे? महाराष्ट्रातील मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही जय शाहाला अध्यक्ष केले. आमचे सरकार का पडले?

 

 

 

 

कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. मात्र आमच्यातले मिंधे, त्यांच्यासोबत पाय चाटत गेले. माझा गुजरातला विरोध नाही. पण तुम्ही गुजरात आणि भारतात भिंत उभी करत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

 

 

 

“निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार करायचे नाही, असा नियम निवडणूक आयोगाने काढला आहे. निवडणूक आयोगाचे नाव मी धोंड्या ठेवले आहे. या धोंड्याने जो नियम काढला आहे

 

 

 

 

तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाला लावा. भाजप लोकांना अयोध्येला घेऊन जाते. कर्नाटकमध्ये जय हनुमानचा नारा देत मोदींनी मते मागितले होते.

 

 

त्यामुळे मोदींच्या मतदानाचा अधिकार पहिल्यांदा काढून टाका, असे आवाहन मी धोंड्याला करतो. शिवसेनेबाबतचा निकाल त्या लबाड नार्वेकरने दिला. तो माणूस आता भाजपकडून निवडणुकीला उभा राहणार आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

 

 

 

 

“मोदींच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील नेत्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. शेतकरी प्रश्न, आरक्षण या विषयावर या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

“शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या शेतकऱ्याच्या बाळाच्या डोक्यावर कर्ज घेऊन तो जन्माला येतो. त्यामुळे आता यावेळी फसलात तर अवघड आहे. शिवसेना देखील 25 वर्षांपासून फसली होती”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

 

 

 

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात मातोश्रीवर बंद दाराआड चर्चा झाली होती.

 

 

 

या चर्चेत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात आला होता. भाजपने हा प्रस्ताव मान्य केला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार केला जातोय. उद्धव ठाकरे यांनी आजदेखील तोच दावा खरा असल्याचं म्हटलं.

 

 

 

यासाठी त्यांनी आज धाराशिवमध्ये तुळजा भवानी देवीची शपथ घेतली. धाराशिवमध्ये आज ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

 

 

“तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो की अमित शाह यांनी मला सांगितले की अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेऊ. 2019 साली अमित शाह यांनी शब्द दिला होता.

 

 

 

 

पण तो शब्द त्यांनी पाळला नाही. ते खोटे बोलत आहेत. मी वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना शब्द दिला होता की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करतो.

 

 

 

यावरून अमित शाह यांनी ठीक आहे असे सांगितले. तुम्ही दिलेल्या शब्द पाळला नाही म्हणून मी तो सूड उगवला. तो पण अजूनही पूर्ण झालेला नाही. पुन्हा एकदा शिवसैनिक मुख्यमंत्री बनेल”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

 

 

 

“2014, 2019 ला आम्ही मोदींचे फोटो लावले होते. तुम्ही बाळासाहेबांचे फोटो लावले होते. तुम्ही खाल्ले ते श्रीखंड आणि आम्ही खाल्ले ते शेण आहे का?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

 

 

 

“भाजपाला काय वाटते की, पूर्ण देश आणि महाराष्ट्र त्यांना आंधन दिला आहे का? आम्ही पण श्रीरामचे भक्त आहोत. नरेंद्र मोदींचे नाव कोणाला माहिती नव्हतं. त्यावेळपासून हिंदुत्वचा झेंडा घेऊन आम्ही कित्येकपटीने पुढे गेलो होतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

 

“क्रिकेटमधील आधीच्या बॅट्समनने सेंचुरी, डबल सेंचुरी मारली आहे, अशी माझी अवस्था झाली आहे. कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचे अभिनंदन करतो. कारण अस्सल शिवसैनिक हा खोक्यांनी विकला जात नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत एक साप निघाला होता.

 

 

 

पण आम्हाला काय माहिती तो साप दूध सोडून कोरक्स प्यायला लागला. त्याच्यावर फिरतोय त्यामध्ये लक्षात येते की मुस्लिम समाज देखील आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. कारण त्यांना लक्षात आले आहे की आमचे हिंदुत्व हे खरे हिंदुत्व आहे”, असंदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *