मंत्रालयातील शालेय शिक्षणाच्या विभागातून ४७ लाख रुपयांची चोरी

The theft of Rs 47 lakh from the Department of School Education in the Ministry

 

 

 

 

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शासनाच्या शालेय शिक्षणाच्या विभागातून ४७ लाख ६० हजार रूपये चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

 

 

आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरी द्वारे ४ टप्प्यात ४७ लाख ६० हजार रूपये काढल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

 

मंत्रालयातील बँक शाखेतून अज्ञात चोरट्यांनी पैसे काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकूण चार व्यक्तीच्या नावे ही रक्कम जमा झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

 

 

 

 

मंत्रालयातील बँकेमध्ये शिक्षण विभागाचे खाते आहे. त्या खात्यातून हे पैसे काढण्यात आले आहेत. या प्रकरणात मरीन ड्राईव्ह पोलीस आधिक तपास करत आहेत.

 

 

 

 

या प्रकरणातील आरोपींनी बनावट चेक, स्टॅम्प आणि स्वाक्षरी यांच्या आधारे पैसे ४ टप्प्यात काढण्यात आले आहेत. दरम्यान ही दुसरी वेळ आहे,

 

 

 

 

पहिल्यांदा पर्यटन विभागाच्या खात्यातून महिन्याभरापुर्वी ६७ लाख रूपये चोरीला गेले होते. या प्रकरणाचा देखील मरीन ड्राईव्ह पोलीस आधिक तपास करत आहेत.

 

 

 

एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे. तर ज्या चार खात्यांमध्ये ही रक्कम जमा झाली आहे ती सर्व बँक खाती ही कोलकत्ता येथील आहेत अशी माहिती समोर आली आहे.

 

 

 

नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे.

 

 

 

 

या प्रकरणी मकरीन ड्राईव्ह पोलिसांनी पोलिस ठाण्यात नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून या चौघांविरोधात कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवी

 

 

 

अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे चौघे नेमके कोण आहेत? यामागे नेमका कोणाचा हात आहे? याबाबत पोलिस तपास करत आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *