Exit Poll 2024 : शिंदे -अजितदादांना किती जागा?

Exit Poll 2024: How many seats for Shunde-Ajitdad?

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे यायला सुरूवात झाली आहे.

 

 

 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.  न्यूज18 नेटवर्कनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व्हे केला आहे.

 

 

 

न्यूज 18 नेटवर्कच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागा तर महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

 

 

 

 

पक्षानुसार आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रात भाजपला 20 ते 23 तर काँग्रेसला 6-9 जागा मिळू शकतात. म्हणजेच या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदेंची शिवसेना तसंच

 

 

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळून 13 ते 15 जागांवर समाधान मानावं लागेल. दुसरीकडे महाविकासआघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळून 9 ते 12 जागा मिळू शकतात.

 

 

 

 

महाराष्ट्रासाठी भाजपने मिशन 45 प्लसचा नारा दिला होता, पण महायुतीला एवढ्या जागा मिळवण्यात यश येताना दिसत नाहीये. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती,

 

 

 

 

त्यामुळे यंदा काँग्रेसला 6 ते 9 जागा मिळत असतील तर त्यांच्या कामगिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्याचं म्हणावं लागेल.

 

 

 

महाराष्ट्रात भाजपने 28 तर शिवसेनेने 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा लढवल्या होत्या. तर महाविकासआघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वाधिक 22 जागा लढवल्या. काँग्रेसने 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *