बारामतीत विधानसभेला पुन्हा पवार विरुद्ध पवार?

Pawar vs Pawar again in Baramati Assembly?

 

 

 

 

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी दोनच दिवसांपूर्वी बारामती मतदारसंघाबद्दल महत्त्वाचे संकेत दिले. बारामतीमधून जय पवारांना संधी देणार का,

 

या प्रश्नाला अजित पवारांनी सकारात्मक उत्तर दिलं. त्यामुळे अजित पवार बारामती सोडतील अशा चर्चांना उधाण आलं. बारामती सोडणारे अजित पवार कुठून लढणार याची चर्चा सुरु झाली.

 

अजित पवारांचा लेक जय पवार आज आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत. त्यांनी कर्जत-जामखेडमध्ये बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

 

जय पवारांच्या कर्जत-जामखेड दौऱ्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. पक्षफुटीनंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या रोहित पवारांना धक्का देण्यासाठी अजित पवार गटानं त्यांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

 

त्याच व्यूहनीतीचा भाग म्हणून जय पवार कर्जत-जामखेडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भेटीगाठी, बैठकांच्या माध्यमातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कर्जत-जामखेडमध्ये अजित पवार गट रोहित पवारांविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

 

अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार २०१९ मध्ये, तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार २०२४ मध्ये लोकसभा लढल्या. पण निवडणुकीच्या राजकारणात दादांच्या पत्नी, लेकाची डाळ शिजली नाही.

 

त्यानंतर आता दादांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जय पवारांना बारामतीमधून संधी देण्याबद्दल अजित पवारांनी सकारात्मक उत्तर दिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

 

जय पवार यांना संधी द्यायला हवी किंवा नाही, हे आमच्या जनतेच्या आणि त्या भागातील कार्यकर्ते यांच्या मागणीवर आहे. मी सात, आठ वेळा लढलो आहे.

 

त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही. शेवटी पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल की कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं.

 

अजित पवार पुत्र जयसाठी बारामती सोडणार असतील तर ते कुठून लढणार याची चर्चा सुरु झाली. त्यावर अजितदादा विधानसभेला माझ्याविरोधात उमेदवार असू शकतात.

 

लोकसभेला सुप्रिया ताईंसोबत जे झालं, तेच आता माझ्या बाबतीत घडू शकतं, असा कयास रोहित पवारांनी वर्तवला. त्यामुळे कर्जत-जामखेड, बारामती मतदारसंघांमधील घडामोडींकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

अजित पवारांनी बारामती जयसाठी सोडल्यास ते स्वत: कर्जत-बारामतीमधून उभे राहण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास काका विरुद्ध पुतण्या संघर्ष होईल.

 

यातून पवारांचा राजकीय वारसदार कोण या प्रश्नाचाही निकाल लागेल. सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात फारशा सक्रिय नसतात.

 

त्यामुळे पवार कुटुंबाच्या राजकीय वारसा विचारात घेतल्यास अजित पवार, रोहित पवारांमध्येच स्पर्धा आहे. अजित पवारांनी

 

बारामतीचा पर्याय निवडल्यास जय पवार कर्जत-जामखेडमधून लढू शकतात. तसं झाल्यासही पवार विरुद्ध पवार सामना होईल.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *