भाजपने दिला अजित पवारांना “या” चार जागेचा प्रस्ताव
BJP proposed these four seats to Ajit Pawar
महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवरून महायुतीतील तिढा अद्याप सुटलेला नाही. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना त्यासाठी दिल्ली गाठावी लागली.
अमित शाह यांच्यासोबत अनेक तास बैठका होऊनही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. महायुतीचं घोडं नेमक अडलंय कुठे?
भाजपचा शिंदेंच्या कोणत्या जागांवर दावा आहे? अजित पवारांना किती जागा मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं ही जागावाटपानंतर मिळणार आहेत.
रात्री साडे दहा ते पहाटे एक वाजेपर्यंत महाराष्ट्रातील तीन बलाढ्य नेते आणि देशातील क्रमांक दोनचे शक्तिशाली समजले जाणारे अमित शाह यांनी बैठक घेतली.
पण अशा पॉवरफुल मंडळींना एक प्रश्न सोडवणं सध्या अवघड झालाय आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार ,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असे सगळेजण शुक्रवार संध्याकाळपासूनच दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली.
संध्याकाळी साडेसहा वाजता अजित पवार आणि सुनील तटकरे हे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पोहचले. संध्याकाळी साडे आठ वाजता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीतील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहचले. मग थोड्या वेळाने तिन्ही पक्ष नेत्यांचा ताफा अमित शाह यांच्या घराच्या दिशेने निघाला.
शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता सुरु झालेली बैठक पहाटे एक वाजेपर्यंत सुरु होती. अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटप आणि उमेदवारांच्या नावावर खलबतं सुरु होती.
जिंकण्याची शक्यता हेच सूत्र विचारात घेऊन जे उमेदवार निवडून येऊ शकणार नाहीत त्यांचे तिकीट कापण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
शिवसेनेचे जे उमेदवार हरण्याची शक्यता आहे असे उमेदवार उमेदवार बदलावेत अशा सूचना अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती आहे.
अमित शाह यांच्योसोबत झालेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना 10 ते 12 जागा तर अजित पवार यांना 3 ते 4 जागा देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
शिंदे गटाकडे असलेल्या या जागांवर भाजप लढण्यास इच्छुक
वायव्य मुंबई
रामटेक
पालघर
हातकणंगले
अजित पवार गटाला यापैकी 3-4 जागा मिळणार
बारामती
शिरूर
रायगड
परभणी
शिर्डी आणि यवतमाळचे उमेदवार बदलले जाण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा युतीच्या नेत्यांना दिल्लीत चर्चा करण्यासाठी यावं लागेल असं दिसतंय. पण दिल्लीतील बैठकीत
मित शाह यांचा मूड सर्व गणित सोडवण्याचा होता असं कळतंय. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या जागावाटपाचे गणित सोडवून अमित शाह यांनी काढलेला आकडा मतदारांच्या पसंतीस पडणार का हे पाहावं लागेल.