अजितदादा महायुतीच्या नेत्यावर संतापले ;सुनावले खडे बोल!;असं काय घडले ?

Ajitdada was angry with the leader of the Mahayuti ;Sunavale Khade Bol!;What happened?

 

 

 

विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सुरू असून महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. त्यातच,

 

आज महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती.

 

शरद पवारांच्या शारिरीक व्यंगावरुन त्यांनी टीका केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला.

 

आधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सदाभाऊंना त्यांच्या वडिलांच्या वयाचा दाखला देत सुनावलं होतं. त्यानंतर, आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट व व्हिडिओच्या माध्यमातून सदाभाऊंवर हल्लाबोल केला.

 

आता, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांनीही सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे.

 

ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी महायुतीतील घटक पक्षांचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे.

 

आम्ही महायुतीचे घटक असलो तरी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही

 

. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही,

 

अशा शब्दात अजित पवारांनी महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांना इशाराच दिला आहे. अजित पवार यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतरही शरद पवार हेच आमचं दैवत असल्याचं अजित पवार सातत्याने सांगतात. तसेच, शरद पवारांबद्दल कुठलेही विधान करण्याचं ते टाळताना दिसून येतात.

 

मात्र, महायुतीमधील काही नेते, आमदार किंवा पदाधिकारी थेट शरद पवारांना लक्ष्य करतात. त्यामुळे, अजित पवारांसह त्यांच्या पक्षातील नेत्यांची चांगलीच अडचण होते.

 

ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व…

 

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी आपली क्षमता ओळखून शरद पवारांवर टीका करावी, असे म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनीही सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच, शरद पवारांवर पातळी सोडून केलेली टीका आमचा पक्ष सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी सदाभाऊ खोत यांना दिलाय.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य शब्दांत टीका केल्याप्रकरणी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सदाशिव खोत यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी निषेध केला आहे.

 

शरद पवार यांच्यावरील वैयक्तिक टीका किंवा अनादर खपवून घेणार नाही, या शब्दात अजित पवार यांनी खोत यांचे कान टोचले आहेत.

 

शरद पवार यांच्या विषयी महायुतीतील घटक पक्षांचे नेते सदाशिव खोत यांनी केलेले वक्तव्य हे निंदनीय आहे. आम्ही महायुतीचे घटक असलो तरी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर शरद पवारांवर वैयक्तिक टीका करणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरीत्या मी या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करतो. यापुढे अशी कोणी खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही’, असे अजित पवार यांनी निवेदनात म्हटले आहे. अजित पवार यांनी महायुतीचेच घटक असलेल्या सदाशिव खोत यांना चांगलेच सुनावले आहे.

 

सांगली जिल्ह्यातील जत येथील प्रचारसभेत सदाशिव खोत यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. सदाशिव खोत हे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष असून भाजपचे विधान परिषद आमदार आहेत. खोत यांनी यापूर्वी शरद पवार यांच्यावर अनेकदा शेलक्या शब्दांत टीका केलेली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *