राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या विधानावर राजकीय पडसाद ;ठाकरेसेना आक्रमक,फडणवीस ब्याकफूटवर
Political backlash on Rashtriya Swayamsevak Sangh's Bhaiyyaji Joshi's statement; Thackeray's army aggressive, Fadnavis on the backfoot

मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे”, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलं आहे.
यावर आता विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. तर, सरकारमधील कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले,
“भाजपावाल्यांचे वरिष्ठ नेते मुंबईत येतात आणि मुंबईची भाषा मराठी नाही असं सांगतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे दोन मिंधे आणि इतर मंत्रिमंडळाने हे वक्तव्य सहनच कसं केलं? मुंबईत कोणीही कुठलीही भाषा बोलू शकतो कारण या शहराची भाषाच नाही असं जोशी यांचं म्हणणं आहे.
जोशी म्हणाले आहेत की घाटकोपरची भाषा गुजराती आहे. अमूक-तमूक भागाची अमुक-तमूक भाषा आहे, मराठी नाही. हेच वक्तव्य ते कोलकाता, लखनौ, चेन्नई, लुधियाना, बंगळुरू किंवा पाटण्यात जाऊन करू शकतात का?”
संजय राऊत म्हणाले, “लखनौची भाषा हिंदी नाही, कोलकात्याची भाषा बंगाली नाही, चेन्नईची भाषा तमिळ नाही असं भैय्याजी जोशी त्या-त्या शहरांत जाऊन बोलू शकतात का? ते केवळ महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत येऊन म्हणतात की मुंबईची भाषा मराठी नाही,
गुजराती आहे. मुंबईत मराठी भाषा येण्याची गरज नाही. कारण इथे मिंध्यांचं सरकार आहे. राज्य सरकार सांगतं की मराठी ही आमची राजभाषा आहे.
ही जर राजभाषा असेल तर त्या भाषेविरोधात केलेलं भैय्याजी जोशींचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं. १०६ हुतात्म्यांनी मुंबईसाठी, मराठीसाठी बलिदान केलं. त्यांनी आजचं हे वक्तव्य ऐकण्यासाठी आपले प्राण अर्पण केले होते का?”
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “या सरकाला थोडा स्वाभिमान असेल, मराठीचा अभिमान असेल, तर जोशींच्या वक्तव्याची निंदा करावी. या लोकांनी (महायुती सरकार) राज्यगौरव दिन सुरू केला आहे. तिथे गौरव गीत गातात, मराठी भाषेचा राजकीय कार्यक्रम करतात, शोबाजी करतात,
मात्र त्यांच्या पक्षाचे नेते, त्यांचे विचारधारावाहक मुंबईची भाषा मराठी नाही असं सांगतात, हा मराठी माणसाचा अपमान नाही का? हा मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाचा अपमान नाही का?
ही भाजपाची, राज्यातील महायुती सरकारची अधिकृत भूमिका आहे की नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं. आज विधीमंडळात भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याची निंदा करावी. त्याचा ठराव पास करावा.”
संजय राऊत म्हणाले, “भैय्याजी जोशींनी जे वक्तव्य केलंय त्यावरून राज्य सरकारने त्यांचा धिक्कार करावा. विधीमंडळात निंदा ठराव मांडावा. तुम्ही असं करू शकत नसाल तर तुमच्या दुधात भेसळ आहे, तुमच्या जन्मातच भेसळ आहे असं आम्ही मानू.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी शिकणे गरजेची नसल्याचे वक्तव्य संघाचे भैय्याजी जोशी यांनी केले होते.
त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संघाचा निषेध करावा, असे आव्हानही राऊत यांनी दिले.
मुंबईत मराठी आणि अमराठीचा वाद सुरू आहे. मराठी माणसांना घरे नाकारणे, त्यांच्यावर बंधने घालण्यापासून ते कार्यक्रम साजरे करण्यास मज्जाव करण्यापर्यंतचे वाद मागील काही महिन्यांमध्ये समोर आले आहेत. त्यातच आता भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी म्हटले की, भैय्यााजी जोशी यांनी मुंबईत मराठी शिकणे गरजेचे नाही असे सांगतात. असेच वक्तव्य इतर राज्यात करण्याची हिंमत भैय्याजी जोशी यांच्यात आहे का, असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
राज्याच्या मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कसे सहन करता? असा सवाल राऊतांनी केला. महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन ते सांगत आहेत या भागाची भाषा मराठी नाही. जर आमची भाषा राष्ट्रभाषा आहे तर हा गुन्हा राजद्रोहात बसतो, अशा शब्दात राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. भैय्याजी जोशींच्या वक्तव्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील 106 हुताम्यांचा अपमान झाला असल्याचे राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी म्हटले की, भाजप नेते असे बोलून मराठीचा मराठी माणसाचा अपमान करत नाही का? तसं नसेल तर फडणवीस तर जाहीर करावं. कुठे आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार? त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी भैय्याजी जोशींविरोधात बोलावे असे आव्हान राऊतांनी शिंदे गटाला केले.
हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे. मराठी तुमची भाषा नाही हे त्यापेक्षा भयंकर आहे, असल्याचे संजय राऊतांनी म्हटले. भैयाजी जोशींचा धिक्कार करावा लागेल नाही, तर तु्म्ही मराठी आईचे दूध प्यायले नाही, असेही आव्हानही राऊतांनी दिले.
भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात आपल्या संबोधनात म्हटले की, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
भैय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही. पण सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मुंबईची महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे आणि मराठी भाषा आली पाहिजे.
भैय्याजी यांच्या मत माझ्यापेक्षा वेगळं असेल असं नाही. आम्ही कुठल्याही भाषेचा अपमान करणार नाही. दुसऱ्यांच्या भाषेचा आम्हाला सन्मान आहे. पण शासनाची भूमिका पक्की आहे आणि शासनाची भूमिका मराठी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आभार मानण्यात कोणती पोटदुखी आहे? – आदित्य ठाकरे
भैय्याजी जोशी यांनी हे मराठी भाषेबद्दल बोलले हे योग्य आहे का? मुख्यमंत्री महोदय आपण मराठीला अभिजात दर्जा दिला आहे. मराठी भाषेचा अपमान करणं योग्य आहे का? असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला होता.
त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलं. त्यानंतर आदित्य ठाकरे आभार मान्यासाठी उभे राहिले पण अध्यक्षांनी वेळेच्या कमतरतेमुळे आभार रेकॉर्डवर घेतले अन् त्यांना बोलू दिलं नाही. त्यावेळी आभार मानण्यात कोणती पोटदुखी आहे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी अध्यक्षांना विचारला. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातल्यावर पाच मिनिट कामकाज स्थगित केलं गेलं.