लोकसभेसोबत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक होणार ?

Maharashtra assembly election to be held with Loksabha? ​

 

 

 

 

 

लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या कोविंद समितीला विविध राजकीय पक्षांकडून

 

 

आतापर्यंत ३५ निवेदने प्राप्त झाली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र निवडणुका घेण्याचे समर्थन केले आहे.

 

 

 

‘एकत्र निवडणुका घेतल्या तर पैशाची बचत होईलच; पण कमी वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडेल,’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी कोविंद समितीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

 

 

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरामच्या निवडणुका अलिकडेच झाल्या होत्या. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र,

 

 

 

हरियानासहित अन्य काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. जर एकत्रित निवडणुका झाल्या असत्या तर राजकीय पक्षांचा वेळ आणि पैसा वाचता असता, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

 

 

 

केंद्रातील ‘एनडीए’ सरकारकडून ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यात एक देश-एक निवडणुकीचा समावेश आहे.

 

 

वारंवार निवडणूक होणे अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही, तसेच ही बाब देशाच्या विकासात व्यत्यय आणते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *