चक्क यूट्यूबवर व्हिडीओ पाहून सुरु केला नोटा छापण्याचा कारखाना
After watching a video on YouTube, he started a banknote printing factory
चक्क यूट्यूबवर व्हिडीओ पाहून अगदी फिल्मी स्टाईल बनावटी नोट कशा छापायच्या हे काही युवकांनी शिकले. हेच नाही तर त्यांनी छापलेला नोटा चलणात देखील आणल्या. नुकताच मोठी भांडाफोड करण्यात आली
. या प्रकरणी पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आलीये. सुरूवातीला त्यांनी कमी प्रमाणात बनावटी नोटी छापल्या. जसेही त्यांना समजले की, त्यांच्या नोटा बाजारात चलनात आल्या
त्यांनी मग अजून नोटा छापण्यास सुरूवात केली. ही घटना उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथील असून या प्रकारानंतर पोलिसही चक्रावले आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.
बनावटी नोटा छापणाऱ्या टोळीकडून तीस हजार रुपयांच्या नोटा स्थानिक बाजारपेठेत चलण्यात आणल्या गेल्या. कोन पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये या बनावटी नोटा तयार केल्या जात असत.
धक्कादायक म्हणजे अनेक दिवसांपासून हे बनावटी नोटा तयार करण्याचे काम सुरू होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक कालू सिंह यांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीकडून आता मोठा खुलासा करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार बनावटी नोट झापणाऱ्या टोळीतील दोन सदस्य प्रमोद मिश्रा, रा. चुर्क बाजार पोलीस स्टेशन, सोनभद्र आणि सतीश राय, रा. नौग्राहा पोलीस स्टेशन,
चुनार जिल्हा, मिर्झापूर हे बनावट नोटा छापण्याची टोळी चालवत होते. त्यासाठी ते मिर्झापूर येथून स्टॅम्प पेपर आणायचे आणि त्यावर बनावट नोटा छापायचे. टोळीचे सदस्य 10 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 500 रुपयांच्या नोटा छापून स्थानिक बाजारपेठेत फिरत.
एएसपी कालू सिंह म्हणाले की, बनावट नोटा छापणारी टोळी पकडल्यानंतर त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, ते मिर्झापूरहून स्टॅम्प आणायचे
आणि 10 रुपयांच्या स्टॅम्पवरील 500 रुपयांची नोट स्कॅन करून प्रिंटरवर छापायचे. बनावट नोट कशी छापायची याचा व्हिडीओ त्यांनी यूट्यूबवर बघितला होता.
पोलिसांनी त्यांच्याकडून तीस हजार रूपयांच्या पाचशेच्या नोटा जप्त केल्या असून यासोबतच स्कॅनर, प्रिंटर आणि लॅपटॉपही जप्त केलाय. आरोपींविरोधात पोलिसांनी कलम 178, 179, 180, 181 बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.