परभणीतील घडलेल्या घटनेमागे कोणीतरी मोठी शक्ती;खा.जाधव

Someone is behind the incident in Parbhani; Kha. Jadhav

 

 

आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

 

आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले. याच पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांनी

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. परंतु त्यांच्या स्वीय सहाय्यकाने फोन उचल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी बुधवारी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही, त्यामुळे आंदोलनाने रौद्ररुप धारण केल्याचा आरोप जाधव यांनी केला.

परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. परंतु तेथील परिस्थिती हाताळण्यास पोलीस प्रशासन कमी पडले.

 

पोलिस अधीक्षक सुट्टीवर गेले आहेत. मुख्यमंत्र्यांशी संपर्क करूनही त्यांनी आवश्यक प्रतिसाद दिला नाही, असे सांगत घटनेच्या मागे कुणीतरी मोठी शक्ती असावी, असा संशय खासदार जाधव यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व बांधवांना विनंती करतो की, काल झालेली घटना ही दुर्दैवी व अत्यंत संतापजनक अशी आहे. झालेल्या घटनेचा निषेध करतो,

 

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करतो. मात्र आपण सर्वजण निषेध व्यक्त करत असताना शांततेच्या मार्गाने बंद पाळावा अशी कळकळीची विनंती खासदार जाधव यांनी केली आहे.

 

जे नुकसान होत आहे ते परभणीमधील जनतेचे आणि मालमत्तेचे होत आहे. आंदोलन करताना शांततेच्या मार्गाने करा. आंदोलन करताना कृपया तुम्ही कायदा हातात घेऊ नका, अशी विनंती खासदार जाधव यांनी आंबेडकरी अनुयायांना केली.

 

काल परभणीमध्ये बांगलादेशामधील घटनेच्या अनुषंगाने मोर्चा निघाला होता. बटेंगे तो कटेंगेचा परभणीत काय विषय आहे? तशा घोषणा परभणीत दिल्या गेल्या.

 

काल घडलेल्या घटनेमागे कोणीतरी मोठी शक्ती असावी, असा संशय जाधव यांनी व्यक्त करीत पोलीस प्रशासनाने अधिक लक्ष घालून तपास करण्याची गरज बोलून दाखवली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *