आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक टेन्शन ,आता मशाल निशाणी वादात

Another tension for Uddhav Thackeray after MLA disqualification result, now in torch sign controversy

 

 

 

 

 

आमदार अपात्रता निकालात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. मात्र उद्धव ठाकरेंच्या अडचणी काही थांबताना दिसत नाही. आता ठाकरेंचं मशाल हे चिन्हही त्यांच्या हातून जाण्याची भीती आहे.

 

 

मशाल चिन्हावर समता पक्षाने पुन्हा दावा ठोकलाय. निवडणूक आयोगाने नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.

 

 

त्यानुसार समता पक्षही आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे.. मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्याचा दावाही समता पक्षाने केलाय.

 

 

तेव्हा आता मशाल चिन्ह ठाकरेंकडे राहणार की त्यांच्या हातातून निसटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

 

 

आमदार अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे.. सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात दाद मागण्यासाठी ठाकरे गटामध्ये हालचालींना वेग आलाय.

 

 

शिवसेना नेते अनिल परब तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.. अनिल परब दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करतील. त्यानंतर मग आज किंवा उद्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे.

 

 

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना शिंदेंचीच असा निकाल काल दिला.. मात्र निकालाची प्रत अद्यापही ठाकरे गटाला मिळालेली नाही. आज दुपारपर्यंत ही प्रत मिळण्याची शक्यता आहे.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या हातून AB फॉर्म का घेतला असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा एक जुना फोटो अंबादास दानवेंनी एक्सवर शेअर केलाय. हा फोटो 30 सप्टेंबर 2019 चा आहे. ज्यात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या हातून एबी फॉर्म घेताना दिसतायत. त्यानंतर शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे आभार मानत ट्विट केलं होतं.

 

 

अपात्रता निकालामुळे घराणेशाही मोडीत निघाली.. बाळासाहेबांच्या हिंदुत्त्ववादी विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय..

 

 

 

हिंगोलीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रात्री मुंबईत आगमन झालं. त्यावेळी बोलताना शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. तर खासदार श्रीकांत शिंदेंची ओळख काय असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय.

 

 

आमदार अपात्रता निकालाने घराणेशाही मोडीत काढली असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. त्यावरुनच आता राऊतांनीही थेट श्रीकांत शिंदेंचं नाव घेत हल्लाबोल केलाय.

 

 

 

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीये.. आदित्य ठाकरेंनी आता एकनाथ शिंदेंना आपला नेता मान्य करावं

 

 

अन्यथा राजीनामा देऊन बाजुला व्हावं असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना मारलाय. दुसरीकडे, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना शिंदेंचीच असा निकाल दिल्याने ठाकरे गट आक्रमक झालाय.

 

 

आमदार अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गटाकडून मुंबईच्या कुर्लामध्ये आंदोलन करण्यात आलं.. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली.. ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं..

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *