शिवसेनेच्या तीन जागेवर भाजपचा डोळा;शिंदे गटात अस्वस्थता
BJP's eyes on Shiv Sena's three seats; Shinde group uneasiness

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अशात महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत.
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी भाजपसह सत्तेत सहभागी झाल्याने आता अनेक जागांवर या तिन्ही
पक्षांकाडून दावा केला जात आहे. अशात शिंदे गट शिवसेनेच्या तीन जागेवर भाजपचा डोळा असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभेच्या पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि दक्षिण मुंबई मतदार संघ भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. पालघर खासदार राजेंद्र गावित हे भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भाजप ही जागा आपल्या ठेवून घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय.
मुंबई दक्षिण शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यामुळे आता दक्षिण मुंबईमध्ये भाजपकडून राहुल नार्वेकर
आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे. इथे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत यांनी आधीच या जागेवर दावा केलाय.
पण राज्यसभावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पाठवलं नाही त्यांच्यासाठी हा मतदार संघ अनुकूल असल्यामूळे भाजप रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेऊन घेऊ शकतात अशी शक्यता आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला आहे. 70 टक्के जागांचा तिढा सुटला असून आता उरलेल्या जागांसाठी पुन्हा बैठक होणार आहे.
बैठकीत काही जागांच्या आदला बदलीवर देखील चर्चा होणार आहे. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर घेण्यात आलेल्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब मात्र दिल्लीत होणार आहे,