बच्चू कडू यांची थेट शरद पवार यांच्याशी चर्चा

Bachu Kadu directly discussed with Sharad Pawar

 

 

 

 

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महायुती सरकारमधील अनेक नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत,

 

अशातच आज(शनिवारी) सकाळी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत आले आहेत.

 

साडे आठ वाजता मोदीबागेत घेणार शरद पवारांची भेट होणार असल्याची माहिती आहे. बच्चू कडू महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक आहेत का अशा चर्चा आता या भेटीमुळे सुरू झाली आहे. बच्चू कडू शिवसेना पक्षफुटीच्या वेळी एकनाथ शिंदेंसोबत गेले होते.

 

गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुती यांच्यात धुसफूस चालू आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवाराला थेट विरोध केला होता.

 

नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आमचा विरोध आहे, अशी भूमिका घेत त्यांनी थेट भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रचार केला होता.

 

आपल्या प्रहार संघटनेच्या वतीने त्यांनी आपला उमेदवार उभा केला होता. लोकसभा निवडणुकीत कडू यांनी आपला उमेदवार मागे घ्यावा,

 

 

यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आला होता. पण त्याला यश आले नाही. शेवटी अमरवाती या जागेवर भाजपाच्या उमेदवारा विजय झाला.

 

तेव्हापासून बच्चू कडू यांनी दिव्यांगांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यांवर वेळोवेळी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता बच्चू कडू आणि खासदार शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे भेटीसाठी मोदी बागेत आल्यानंतर त्यांनी या भेटीबाबत माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शेतकरी, दिव्यांगासाठी वेळ पडली तर काहीही करू असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

 

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ही भेट आधीच ठरलेली होती. काही मुद्द्यावर चर्चा करायची आहे. शेतकरी, मजुरांचे प्रश्न महत्वाचे आहेत. अंपगाचे प्रश्न आहेत.

 

 

हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 1 सप्टेंबर पर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर मी माझा पुढचा निर्णय घेईल. ⁠याच मुद्द्यांवर आज शरद पवार यांची भेट घेत आहे.

 

 

मला अंपग, शेतकरी, मजुर यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. हे प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे. त्यासाठी मी काहीही निर्णय घेऊ शकतो. या मुद्यावरूनच कोणाबरोबर जायचे याचा निर्णय होईल, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

 

आम्ही काल जे मुद्दे मांडले त्यावरती चर्चा मी शरद पवारांशी करणार आहे. 1 सप्टेंबर पर्यंत महायुतीला वेळ दिला आहे. त्यांच्यासोबत बाकी कोणते पक्ष या मुद्द्यांवर चर्चा करतील त्यांचे मत सांगतील,

 

त्यासाठी शरद पवारांची भेट घेत आहोत, असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. नाराजीबाबतच्या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, मी कोणावरती नाराज नाही. राणा दाम्पत्याचा बरोबर असलेल्या वादाचा येथे काहीही संबंध नाही.

 

 

आजच्या शरद पवारांसोबत होणाऱ्या बैठकीत शरद पवारांनी ऑफर दिली तर या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, 1 सप्टेंबर पर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही.

 

 

सरकारला वेळ देणार आहे, शरद पवारांशी चर्चा करणार आहे, शेतमजूर, दिव्यांग यांच्या प्रश्नासाठी आम्ही काहीही करू असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *