महायुतीचे जागावाटप कसे होणार, भाजपच्या माजीकेंद्रीय मंत्र्याने सांगितले …
Former minister of BJP said how the seat distribution of the grand coalition will be done...
देशातील लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. येत्या काही दिवसांतच निवडणुका जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
असे असतानाच महायुतीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)-शिवसेना (एकनाथ शिंदे) जागावाटपावरून चर्चा सुरु झाली आहे.
यावरून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विधान केले आहे. ‘जागा वाटपाची चर्चा तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा होईल. वैयक्तिकरित्या अद्याप कुठलाही, आग्रह किंवा निर्णय झालेला नाही’, असे त्यांनी सांगितले.
भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विन वैष्णव यासोबत इतर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीबाबत रावसाहेब दानवे म्हणाले, ‘सरकारने घेतलेले निर्णय कसे पोहचावे या संदर्भात आज बैठकीत निर्णय झाला आहे.
आगामी काळात महायुती म्हणून विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे पुणे येथे 21 जुलै रोजी अधिवेशन होणार आहे.
जागा वाटपाची चर्चा तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा होईल. वैयक्तिकरित्या अद्याप कुठलाही, आग्रह किंवा निर्णय झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, संपूर्ण राज्यासाठी आज चर्चा झाली आहे. मराठवाड्यासाठी झाली नाही. 288 मतदार संघात युती म्हणून आम्ही लढणार आहेत.
जागा वाटपाची चर्चा तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून केली जाणार आहे. वैयक्तिकरित्या अद्याप कुठलाही, आग्रह किंवा निर्णय झालेला नाही.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या महायुतीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)-शिवसेना (एकनाथ शिंदे)
या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांकडून जागा वाटपावरून चर्चा सुरु झाली आहे. यावरून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.