जागावाटपात शरद पवारांनी काँग्रेस-ठाकरेंचा गेम केला,आता पुढील टारर्गेट…

Sharad Pawar played Congress-Thakreen game in seat allocation, now the next target...

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी ते सिद्ध करुन दाखवले आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार

 

किंवा त्यांच्या पक्षातील बड्या नेत्याने काहीच वक्तव्य केले नाहीत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात कमालीची रस्सीखेच सुरु होती.

 

त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची परिस्थिती झाली होती. शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद दिल्ली दरबारी गेला होता. स्वत: राहुल गांधी यांना उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी लागल्याचे म्हटले जात आहे.

 

परंतु जागा वाटपाचा फॉर्म्युला आला तेव्हा किंगमेकर शरद पवारच निघाले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी 85-85-85 जागा लढण्याचा निर्णय घेतला.

 

शरद पवार यांच्या पक्षाला 85 जागा मिळणे हे त्यांच्या राजकीय दूरदृष्टीकोनाचे चित्र आहे. दुसरीकडे अजित पवार यांना महायुतीमध्ये सर्वात लहान भावाची भूमिका घ्यावी लागली आहे.

 

शरद पवार यांनाच्या राष्ट्रवादीला 85 जागा मिळाल्या आहेत. आता 84 वर्षीय शरद पवार यांनी सर्व लक्ष निवडणुकीकडे केंद्रीत केले आहे. उमेदवार निवड आणि प्रचार यामध्ये स्वत: जातीने त्यांनी लक्ष दिले आहे.

 

महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकण्याकडे त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे आतापर्यंत मुख्यमंत्रीपदावर दावा न करणारे शरद पवार निवडणुकीनंतर त्यावर दावा करु शकतात.

 

तिन्ही पक्षांत जो सर्वाधिक जागा जिंकले, तो पक्ष सत्ता मिळत असल्यास मुख्यमंत्री पदावर दावा करणार आहे. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला सर्वाधिक चांगले यश मिळाले होते.

 

जागा वाटप करताना शरद पवार यांनी आपल्या राजकीय दूरदृष्टीकोन दाखवून दिला आहे. त्यांची राजकीय सौदेबाजीची क्षमता सर्वाधिक दिसून आली आहे. त्यांनी आपल्या काही जागांचे आदान-प्रदान केले आहे.

 

जसे पश्चिम महाराष्ट्रातील पाटण सीट शिवसेना युबीटीसाठी सोडली. गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी शरद पवार यांचा पक्ष विजय मिळवू शकला नाही.

 

तसेच मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा प्रभाव पाहून त्या ठिकाणी जास्त जागा मिळवल्या आहेत. चंद्रपूरमधून अपक्ष आमदार किशोर गजानन जोरगेवार

 

यांना राष्ट्रवादी आणले आहे. त्यामुळे त्यांची जागा आणखी एकने वाढणार आहे. एक, एक जागेचा विचार शरद पवार यांनी केला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *