पुढचा मुख्यमंत्री कोण होणार ?काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

Who will be the next Chief Minister? What did Devendra Fadnavis say? ​

 

 

 

 

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल” असे पॉलिटिकली करेक्ट उत्तर दिले.

 

 

 

आम्ही तिन्ही पक्ष मिळून याचा निर्णय घेऊ आणि यात मोठा रोल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल, असेही फडणवीसांनी नमूद केले. एका वृत्तसमूहाच्या पुरस्कार सोहळ्यात फडणवीसांनी मुलाखतीत प्रश्नांना उत्तरं दिली.

 

 

 

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात, तसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सर्व नेते आणि कार्यकर्ते आपापल्या नेत्याला मुख्यमंत्री करण्याचं म्हणतात.

 

 

 

 

ही गोष्ट संख्याबळावर ठरत असली तरी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, असे उत्तर दिले.

 

 

 

 

केवळ संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. यासंदर्भात आमचे वरिष्ठ नेते तिन्ही पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतील. शेवटी माझा नेता मोठा झाला पाहीजे हे कार्यकर्त्यांचे मोटिवेशन असते, असे फडणवीस म्हणाले.

 

 

 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं जेव्हा आमचे नेते म्हणतात, तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना आनंद वाटतो. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांसमोर सांगितलं की आपल्याला अजित पवार

 

 

 

किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे, तर टाळ्या वाजवतील पण तुलनेने कमी वाजवतील. तो उत्साह येणार नाही. शेवटी त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही वाटतं,

 

 

 

 

की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे. पण अल्टिमेटली आम्ही तिघेही याचा निर्णय घेऊ आणि यात मोठा रोल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल” असे देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *