शरद पवारांचे भाजपला धक्यावर-धक्के ; फडणवीसांचा निकटवर्तीय पवारांच्या भेटीला

Sharad Pawar's blow to BJP; Fadnavis's close friends meet Pawar

 

 

 

पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीवेळी आधी महाविकास आघाडीच्या तळ्यात असलेले पाटील

 

अचानक भाजपच्या मळ्यात गेले होते. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाची साथ देत अभिजीत पाटील भाजपला धक्का देण्याची शक्यता आहे.

 

अभिजीत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे समरजीत घाटगे, हर्षवर्धन पाटील, संजय काकडे यांच्यापाठोपाठ शरद पवारांचा फडणवीसांना आणखी एक दणका मानला जात आहे.

 

अभिजीत पाटील यांनी आधीच माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले होते. त्यांनी माढा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करत विधानसभेसाठी शड्डू ठोकला होता.

 

कुस्ती फक्त खेळायला नाही, तर कुस्ती मारायला म्हणजे जिंकायला आलोय, असं सूचक वक्तव्य करत अभिजीत पाटील यांनी

 

विधानसभा लढवण्याचा मनसुबा बोलून दाखवला होता. त्यामुळे शरद पवार गटात प्रवेश करुन अभिजीत पाटील निवडणूक लढण्याच्या चर्चांना बळ आले आहे.

 

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ऐवजी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईतून अभिजीत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला होता.

 

आधी शरद पवारांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या अभिजित पाटील यांनी कारखान्यावरील कारवाईनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

 

त्यानंतर लगेचच माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबाही जाहीर केला होता. दुर्दैवाने दोन्ही उमेदवारांना पराभवाचा झटका बसला.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांना पदावरून हटवले. प्रदेश संघटन सचिव ही नवी जबाबदारी देण्यात आल्याने

 

चर्चेशिवाय नियुक्ती करण्यावरुन संतप्त झालेल्या राऊत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. पक्षाने पुनर्विचार न केल्यास बंडाचे संकेत दिले आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *