ज्यांच्या डोक्यावर केस नाही तेही आता डोक्यावरून कंगवा फिरवताय

Even those who have no hair on their head are now twirling a comb over their head

 

 

 

राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी अनेक पक्षातील अनेक नेते हे दावेदारी करत आहेत. दरम्यान, एबीपी माझाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं होतं की,

 

ज्यांच्या डोक्यावर केस नाहीत, असेही आता डोक्यावरून कंगवा फिरवत आहेत. असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली असून

 

नितीन गडकरी यांचे हे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने, असं म्हटलं आहे. तसेच नितीन गडकरी ) हे ज्यावेळी नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवतात

 

त्यावेळी तेही मी पंतप्रधानांचा दावेदार असल्यासारखीच निवडणूक लढवतात, अस म्हणून नाना पटोले यांनी नितीन गडकरींवर टीका केलीय.

दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार आणि रामटेकचे खासदार श्याम बर्वे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऐवजी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासाठी मत मागताना दिसत आहेत.

 

त्यामुळे मविआत आधीच रामटेकच्या जागेवरून घमासान झाले असताना रामटेक मतदारसंघात मविआत बिघाडी झालीय का? असा सवाल या निमित्याने विचारला जाऊ लागला असताना यावर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचार करत आहेत.

 

मात्र, रामटेकमधली परिस्थिती काय आहे, हे मला माहीत नाही. त्या परिस्थितीची मी माहिती घेऊन मग यावर बोलेल. असे म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना IANS- MATRIZE च्या सर्व्हेची आकडेवारी समोर आलेली आहे. यामध्ये विदर्भात 62 जागांपैकी महायुतीला 32 ते 37 जागा मिळतील,

 

असा अंदाज IANS-Matrize च्या सर्व्हेने व्यक्त केलाय. तर महाविकास आघाडीला 21 ते 26 जागा मिळतील, असं सर्व्हेतून समोर आलं आहे. दरम्यान, विधानसभा हरियाणात ही असेच सर्व्हे दाखवले होते.

 

मात्र परिस्थिती वेगळी आहे. तर या नालायक व्यासस्थेला सत्तेतून काढणे हे आधी महत्वाचं आहे. राज्याला लागलेली भाजपची कीड काढणे महत्त्वाचं आहे. असेही नाना पटोले म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *