मतमोजणीत बाळासाहेब थोरातांना 70 टक्के पोस्टल मते, EVM मध्ये मात्र पराभव

Balasaheb Thorat gets 70 percent postal votes in counting, but loses in EVM

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाली. तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट

 

आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर आरोप केले जात आहेत.

 

आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमधील ट्रेंड इतका कसा बदलला? असा सवाल उपस्थित करत धक्कादायक आकडेवारीच मांडली आहे. तसेच हीव्हीपॅट मतमोजणीची मागणी देखील त्यांनी केली आहे.

 

ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेत वरूण सरदेसाई म्हणाले की, विधानसभेचा निकाल लागला. पण, त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीत. विरोधी पक्षातील अनेक उमेदवारांना सम-समान आकडेवारी पाहायला मिळाली.

 

एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे पोस्टल आणि बॅलेट मतदान. पोस्टल, बॅलेट मतदान हे ट्रेंडचं रिप्रेझेंटेशन असतं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मविआचा 31 जागांवर लीड होतं तर 16 जागांवर महायुतीला लिड होतं.

 

2024 च्या विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडी 143 जागांवर लीडवर आहे. तर महायुती 140 जागांवर आघाडीवर आहे. तर ईव्हीएमच्या आकडेवारीत 143 वरून 46 जागांवर महाविकास आघाडीला लीड आली आहे, असे त्यांनी म्हटले.

 

ते पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना 51 टक्के मतं पोस्टलमध्ये मिळाली. 30 टक्के मतं मिलिंद देवरा यांना मिळाली. आदित्य ठाकरे 21 टक्क्यांनी पुढे होते. Evm मध्ये बघितलं तर 44 टक्के आदित्य ठाकरे यांना

 

तर 38 टक्के देवरा यांना मते मिळाली. महाविकास आघाडीच्या जवळपास अनेक उमेदवार हे पोस्टलमध्ये महायुतीच्या उमेदवारापेक्षा मोठ्या फरकाने पुढे आहेत. तर evm मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार महायुती उमेदवाराच्या एकदम मागे गेलेत.

हे सगळे आकडे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरून घेतले आहे. पोस्टल टू ईव्हीएम मतं आमची कुठेच कशी वाढली नाहीत? यामध्ये अनेक सीट्स आम्ही हरलो तर काही सीट्स आम्ही जिंकलो.

 

35 ते 40 मतदार संघाचे टेबल स्वतः तयार केले आहेत. मला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचा होता हा ट्रेंड कसा काय येतो? पोस्टलमध्ये महाविकास आघाडी 143 जागांवर पुढे होती तर 140 जागांवर महायुती होती

 

तर मग evm मतमोजणी सुरु होते तेव्हा ४६ जागावर महाविकास आघाडीने आघाडी घेतली तर 230 जागांवर महायुती आघाडीवर कशी आली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

एवढी मोठी तफावत कशी आली? लोकसभेचा ट्रेंड बघा तो ट्रेंड का बदलला? या आकडेवारीचा अभ्यास केला तर एकच दिसत आहे की, पोस्टलमध्ये आम्ही पुढे असताना evm मध्ये 5 ते 15 टक्क्यांनी मागे गेलो, यातच गोंधळ झाला आहे.

 

हीव्हीपॅटची मतमोजणी करण्यासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले असताना अनेक ठिकाणी असा सांगितलं जातंय की आम्ही मॉक पोल करून दाखवणार आहोत. आमची मागणी आहे की, हीव्हीपॅटची मतमोजणी झाली पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *