प्रचाराचे भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली

An unknown object was thrown at Sharad Pawar while his campaign speech was going on

 

 

 

 

 

राज्यात राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेतेही मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही प्रचारासाठी दौऱ्यांच्या माध्यमातून आघाडी घेतली आहे.

 

 

 

 

गुरुवारी सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी पुण्यातील सभेला संबोधित केले होते. त्यानंतर, आज बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार होम ग्राऊंडवर जनतेशी संवाद साधत आहेत.

 

 

 

 

 

या सभेदरम्यान, उपस्थितांपैकी एकाने शरद पवार बोलण्यासाठी उभे राहिलेल्या व्यासपीठाकडे एक वस्तू फेकली, ती वस्तू त्यांच्या बॉडीगार्डने कॅच पकडून घेतली. यावेळी, बॉडीगार्डच्या चेहऱ्यावरील हावभावही संतापजनक होते.

 

 

 

 

बारामती येथील सभेतून शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी, भाषणाच्या सुरुवातीलाच कन्हेरी गावचा उल्लेख करत गावकऱ्यांची मने जिंकली.

 

 

 

गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे आपण निवडणूकीची सुरुवात कन्हेरी येथून करतो असे ते म्हणाले. यावेळी, शरद पवारांनी सभास्थळी उपस्थित एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला नावानिशी ओळखले,

 

 

 

 

तुम्ही गुरुजी आहात का ? (पांडुरंग झगडे असे नाव) असे शरद पवारांनी म्हटले. त्यानंतर, त्यांचे वय विचारले असता, झगडे यांनी 94 असल्याचे सांगताच, आपण माझ्यापेक्षा वडील आहात का? असेही पवार म्हणाले.

 

 

 

 

 

दरम्यान, शरद पवारांचे भाषण सुरु असतानाच सभेतील उपस्थितांकडून काहीतरी वस्तू त्यांच्या दिशेने फेकण्यात आली, ती वस्तू शरद पवारांच्या पाठिमागे उभे असलेल्या बॉडीगार्डने कॅच पकडली. त्यावेळी, त्यांच्या चेहऱ्यावर संतापाचे, रागाचे हावभाव दिसून आले.

 

 

 

 

दरम्यान, माहिती घेतली असता संबंधित व्यक्तीने लीपर माईक त्यांच्या दिशेने फेकला होता. त्यामुळे, हा कुठलाही अनुचित प्रकार नसून माईक देण्यासाठी चुकीच्या पद्धतीने संबंधिताने प्रयत्न केला.

 

 

 

शरद पवारांनी आपल्या सभेत बोलताना स्थानिक ग्रामस्थांना मी अनेकदा इथं आल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे सन-सनावळीही त्यांनी सांगितली.

 

 

 

 

मी 1967 पासून आतापर्यंत इतक्या वेळा मी इथे आलो आहे, 67, 71, 72, 77, 80, 85, 90, 95, 2000 आणि तिथून पुढे चार वेळा आल्याचं पवार म्हणाले.

 

 

 

हे सरकार घटना बदलणार असल्याचे सांगत आहे, असे म्हणत शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. तसेच, अमित शहा नावाचे गृहस्थ आहेत,असे पवारांनी म्हणताच (खालून लोकांनी, तडीपार असे म्हटले)

 

 

 

 

त्यावर तुम्हाला बरंच काही माहीत आहे, अशी दाद पवारांनी दिली. दरम्यान, शरद पवारांनी 10 वर्षात काय केलं असं ते विचारतात. गेल्या 2014 ते 24 पर्यंत तेसत्तेत होते, मंत्री ते होते आणि हिशेब मला विचारतात, असा टोला पवारांनी अमित शाह यांना लगावला.

 

 

 

मोदी सांगतात महागाई कमी करू 50 टक्के नी कमी करू सांगितले 50 टक्के कमी नाही केलं, दीड पट कमी झाले
जे तुम्ही पिकवता ते स्वस्त आणि दुसरे पिकवतात ते महाग.

 

 

 

 

 

वरच्या खिशात 6 हजार देतात आणि खालच्या खिशातून काढून घेतात, ही पाकीट मारीबंद करायची आहे, असे म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

 

 

 

 

 

दरम्यान, चिन्ह गेलं, कोर्टात गेले त्यावर कोर्टाने लिहायला सांगितले आहे. पण, आपल्याला वाद वाढवायचं नाही, संघर्ष वाढवायचा नाही,

 

 

 

 

आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे, तुतारी बटन दाबा, कसे दाबा ते काल कुणीतरी सांगितले आहे, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *