मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; पहा कोणत्या मंत्र्यांना कोणाला कोणती खाती?, संपूर्ण यादी

Cabinet portfolio allocation announced; See which ministers have which portfolios?, complete list

 

 

 

राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप काल (21 डिसेंबर)ला जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन (जीएडी),

 

ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम-एमएसआरडीसी),

 

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे. तर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे.

 

कोणाला कोणते खाते मिळाले, संपूर्ण यादी-
कॅबिनेटमंत्री-
– देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
– एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण

 

– अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन
– चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
– राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)

 

– हसन मुश्रीफ – मेडिकल एज्युकेशन
– चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
– गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)

– गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता
– गणेश नाईक – वनमंत्री
– दादाजी भुसे – शालेय शिक्षण

– संजय राठोड – जलसंधारण
– धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा

 

– मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास
– उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा

 

– जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
– पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी

 

– अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी
– अशोक ऊईके – आदिवासी विकास

– शंभुराज देसाई – पर्यटन, खनिकर्म
– अॅड.आशिष शेलार – सांस्कृतिक कार्य आणि आयटी

– दत्तात्रय भरणे – क्रिडा आणि अल्पसंख्याक विकास
– आदिती तटकरे – महिला व बालविकास

– शिवेंद्रसिंह भोसले – सार्वजनिक बांधकाम
– अॅड.माणिकराव कोकाटे – कृषी

– जयकुमार गोरे – ग्रामविकास
– नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
– संजय सावकारे – टेक्सटाईल

– संजय शिरसाट – सामाजिक न्याय
– प्रताप सरनाईक – परिवहन

– भरतशेठ गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागर जमीन विकास
– मकरंद जाधव पाटील – मदत आणि पुनर्वसन

– नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
– आकाश फुंडकर – कामगार

– बाबासाहेब पाटील – सहकार
– प्रकाश आबीटकर – आरोग्यमंत्री

 

राज्यमंत्री-
– माधुरी मिसाळ – नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, मेडिकल एज्युकेशन, अल्पसंख्याक विकास

– आशिष जयस्वाल – अर्थ, कृषी, मदत व पुनर्वसन, कायदा आणि न्यायालये, कामगार

– पंकज भोयर – गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म
– मेघना बोर्डीकर – साकोरे – आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास

– इंद्रनील नाईक – उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन आणि माती व जलसंधारण

– योगेश कदम – गृह (शहरी), महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *