Plane Crash News;टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटातच सर्व संपले
Plane Crash News;It was all over just a few minutes after takeoff.

गुरुवारी (12 जून) दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ड्रीमलाइनर 787 क्रॅश झाले. या विमानात 242 प्रवासी होते, या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ देखील पुढे येत आहेत.
हे सुद्धा वाचा;पाहा LIVE VIDEO; अहमदाबादमध्ये 242 प्रवासी असलेले एअर इंडियाचे विमान कोसळले
विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जात असताना ही दुर्घटना घडली. या विमानात प्रवास करत असलेल्यांची नावे अजून पुढे आले नसून बचावकार्य राबवले जात आहे. विमानाचे अवशेष मेघानीनगर परिसरात आढळले आहेत. आग आणि धुरांचा लोट दूरपर्यंत दिसत आहे.
विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. या अपघातात जखमी झालेल्यांना सरकारी रूग्णालयात दाखल केले जात आहे.
हे सुद्धा वाचा;Indian Railways Breaking News;रेल्वे आरक्षणाच्या नियमात 1 जुलैपासून मोठे बदल
याच पार्श्वभूमीवर रूग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. तात्काळ रूग्णालयात पोहोचण्याचे आदेश लागू करण्यात आली आहेत. सरकारी रूग्णालयात एकच धावपळ सुरू असल्याचेही एक चित्र बघायला मिळतं.
आगीवर नियंत्रण मिळवले आहे. विमान टेकऑफ झाल्यानंतर काही मिनिटात हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर विमानाचा जवळपास संपूर्ण भाग जळाला आहे.
हे सुद्धा वाचा;Imtiaz Jalil Breaking News;इम्तियाज जलील यांचे मंत्री शिरसाट यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप
हेच नाही तर विमान ज्या इमारतीवर धडके, त्या इमारतीचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनकडे जात होते.
विमानात 242 प्रवासी असल्याचीही माहिती मिळत आहे. अपघातानंतर एक भीतीचे वातावरण परिसरात बघायला मिळत आहे. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला, याबद्दलची माहिती ही अजून मिळू शकली नाहीये.
हे सुद्धा वाचा;Maharashtra Monsoon Alert;पाच दिवस धोक्याचे ;हवामान विभागाचा मोठा इशारा
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. जखमींना रूग्णालयात दाखल केले जात आहे. उडाण घेतल्यानंतर काही मिनिटांमध्ये हा अपघात झाल्याचेही कळत आहे. सोशल मीडियावर या अपघात अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसत आहेत.