निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितले ,फेर मतमोजणी करता येणार नाही

The Election Commission has made it clear that there will be no recount of votes.

 

 

 

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीनं आता ईव्हीएमविरोधात रान पेटवलं आहे. गल्लीपासून सुरू झालेला ईव्हीएमवरील टीकेचा सूर आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे.

 

थेट महायुतीच्या मोठ्या विजयावर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीवरच शंका उपस्थित केली जात महाविकास आघाडीच्या अनेक पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे.

 

पुण्यात हाच मुद्दा धरत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव उपोषणाला बसले आहेत. आढाव यांच्या पुण्याच्या फुले वाड्यातील आत्मक्लेश आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान याच सगळ्या घडामोडींवर आता केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिला आहे.

 

फेर मतमोजणीचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे. न्यायालयाने आदेश दिले तरच फेर मतमोजणी होऊ शकते . ⁠फेर मतमोजणी पूर्ण शक्य नाही . सध्या ज्या तक्रारी आल्या आहेत.

 

त्या EVM VVPAT मशीन योग्य काम करतायेत का याबाबतच आहेत . ⁠जिल्हानिहाय निवडणूक अधिकारी अशा तक्रारींचा निपटारा करत आहेत.

 

सध्या फेर मतमोजणी कुठेही सुरु नाही किंवा करता येणार नाही. ⁠फेर मतमोजणी हा सर्वस्व न्यायालयाचा अधिकार नाही.

 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. निकालावरुन विरोधकांनी मात्र ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे.

 

महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.पालघर जिल्ह्यात पाच उमेदवारांकडून ईव्हीएम आणि वीवीपॅटच्या फेर तपासणीची मागणी केली आहे.

 

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंनी ईव्हीएम आणि वीवीपॅटच्या फेर तपासणीची मागणी केली आहे. तर भाजपच्या राम शिंदेंनी देखील फेरमतमोजणीसाठी अर्ज केला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *