पाच जिल्ह्यांना दोन दिवस पावसाचा इशारा

Rain warning for two days for five districts

 

 

 

ऑक्टोबर महिना सुरू झाला असला तरी देखील पावसाचं सावट कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस सुरु आहे.

 

पण या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काही ठिकाणी तापमानात चढ उतार होताना दिसत आहे. मुंबईमध्ये उष्णतेने लोकं हैराण झाले आहेत. कधी उष्णता तर कधी पाऊस असं चित्र आहे.

 

मुंबईचे कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअसवर आहे. त्यातच पुढील दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.

 

मुंबईसह ठाण्यात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हा ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळणार आहे.

 

हवामान विभागाच्या माहितीनुसार 17 ऑक्टोबरला पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.

 

कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. कोकणामध्ये भात कापणीला आलेला असताना पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

 

 

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

 

जालना, परभणी, हिंगोलीत देखील काही प्रमाणात पाऊस होत आहे. पण रविवारपर्यंत तो वाढण्याची शक्यता आहे. 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी

 

हवामान विभागाने हा पावसाचा इशारा दिला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला. आता परतीचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

दिनांक 18 व 19 ऑक्टोबर रोजी धाराशिव, नांदेड, लातूर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.सं. ने हळूहळू वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

 

 

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 18 ते 24 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

 

 

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

 

 

संदेश : शेतकरी बांधवांनी काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, मळणी केलेल्या सोयाबीनची उन्हात वाळवूनच साठवणूक करावी.

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात किडींच्या व्यवस्थापनासाठी, फ्लोनिकॅमिड 50% डब्ल्यूजी 2 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझिन 25% एससी 20 मिली किंवा डायनोटेफ्युरॉन 20% एसजी 2.5 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 50% डब्ल्यूपी 12 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

 

खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत करून घ्यावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी.

 

पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

 

गहू पिकाच्या उत्तम वाढीसाठी सुपिक जमिन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असावा. कोरडवाहू गव्हाच्या लागवडीसाठी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या जमिनीची निवड करावी.

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत खतमात्रा दिली नसल्यास 50 ग्रॅम पोटॅश प्रति झाड देण्यात यावे. उपग्रहाच्या छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे नविन लागवड केलेल्या केळी बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. आंबा बागेत ‍किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, बागेत किटकनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

 

आंबा बागेत एनएए 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उपग्रहाच्या छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.उपग्रहाच्या छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

 

द्राक्ष बागेत नविन फुटव्यावर रोगाचा प्रादूर्भाव होउ नये म्हणून रोगनाशकाची फवारणी करावी. उपग्रहाच्या छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे नविन लागवड केलेल्या सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

 

पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

 

 

भाजीपाला

भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

भेंडी पिकावर फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस 6 मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5 एससी 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

 

भाजीपाला पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. उपग्रहाच्या छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे.

 

 

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. उपग्रहाच्या छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे फुल पिकास आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.

 

 

पशुधन व्यवस्थापन

तापमानात वाढ झाल्यामूळे, जनावरांच्या गोठ्याच्या छतावर साळीचे गवत किंवा स्प्रींकलरची व्यवस्था करावी, जेणेकरून गोठयाच्या आतील तापमानात घट होईल. जनावरांना सावलीत किंवा गोठ्यामध्ये बांधावे. गोठ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी ठेवावे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *