पुढील 24 तासांत मुसळधार ;पाहा कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर ?
Heavy rain in the next 24 hours; see which parts of the rain?
मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं राज्यात अद्यापही उसंत घेतलेली नाही. मुंबईपासून पालघर, ठाणे आणि रागयगडमध्येही हेच चित्र असून, शहरासह उपनगरीय भागांमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
गुरुवारी पावसानं काहीशी उघडीप दिलेली असली तरीही सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकडा काळे ढग दाटून आले आणि पावसानं पुन्हा सर्वांनाच अडचणीत टाकलं.
मान्सूननं परतीचा प्रवास सुरु केला असला तरीही राज्याला मात्र याच परतीच्या पावसाचा दणका बसताना दिसत आहे. पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून,
काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण अंशत: कमी राहील. परिणामी इतक्यात काही लख्ख सूर्यप्रकाश पाहता येणार नाही, असंच चित्र सध्या स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पाण्याची पातळी ओलांडली आहे. ज्यामुळं मच्छी मार्केट परिसरामध्ये पुराचे पाणी घुसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या या नदीनं आता धोका पातळी ओलांडल्यानं प्रशासनही सतर्क झालं आहे. या भागामध्ये
सध्या पावसाचं प्रमाण काही अंशी कमी असलं तरी सरीवरचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय ज्यामुळं नदीच्या पाणीपातळीत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे.
काही दिवस उघडीप दिल्यानंतर आता अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. नाशिकमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं असून, इथं हवानान खात्याने नाशिकला यलो अलर्ट जारी केला आहे.
तर, नागपुरातही मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. पावसामुळे इथं अनेक सखल भागात पाणीच पाणी साचलं असून, इथंही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मागच्या दोन दिवसापासून देशात पावसानं धुमाकूळ घातला आहे. पावसाने लोकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. सप्टेंबर महिन्यात अनेक राज्यांमध्ये अति मुसळधार पावसानं महापुराची स्थिती निर्माण झाली.
त्यामुळे घरात पाणी आलं, महापुराची समस्या निर्माण झाली. पुढचे काही दिवस अति मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट आहे.
मुंबईसह राज्यात आणि गुजरातच्या सीमेवर चक्रीवादळाचा प्रभाव पुन्हा एकदा दिसणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. एकीकडे john cyclone मुळे मोठं नुकसान झालं आहे. मेक्सिकोमध्ये या चक्रीवादळाने नुकसान होत आहे.
तर त्याच वेळी उत्तर-पश्चिम आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. याचा परिणाम भारतावर आणि आसपासच्या देशांवरही देसून येणार आहे.
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 30-40 किमी असेल, तर कमाल वेग 55 किमी प्रति तासापेक्षा जास्त असू शकतो.
आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, “चक्रीवादळ वाऱ्याचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे आज महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस पडेल.
“आम्ही कोकण गोवा, गुजरात प्रदेश आणि महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट दिला आहे. येत्या 48 तासात समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये असं आवाहन केलं आहे. तर समुद्रकिनाऱ्याजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
स्कायमेट हवामानानुसार, पुढील 24 तासांत महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, बिहार आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
सिक्कीम, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
ईशान्य भारत, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, किनारी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, पंजाबचा काही भाग, उत्तर हरियाणा, पूर्व राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, दिल्ली, पश्चिम गुजरात, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.