जगातले 10 सर्वात असुरक्षित देश

The 10 most unsafe countries in the world

bj admission
bj admission

 

 

जगात महायुद्धाचा धोका वाढत आहे. मध्य पूर्वेत दोन वर्षांपूर्वी गाझामध्ये सुरू झालेले युद्ध आता इराणपर्यंत पोहोचले आहे. इजरायल आणि इराण एकमेकांवर हल्ले करत आहेत.

 

 

रशिया आणि युक्रेनमध्येही युद्ध सुरू आहे. Global Peace Index 2025 नुसार, जग पूर्वीपेक्षा कमी शांत होत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर शांततेत आज सर्वात जास्त घसरण झाली आहे आहे. त्यामुळे जगातले 10 सर्वात सुरक्षित आणि 10 सर्वात असुरक्षित देश कोणते आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

 

“या” जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट, शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर

इस्टीट्यूट फॉर इकोनॉमिक्स अँड पीस (IEP) दरवर्षी ग्लोबल पीस इंडेक्स जारी करते. या इंडेक्स मधून जग किती सुरक्षित आहे, हे समजते. 2025 च्या अभ्यासाचे निष्कर्ष जगातील सर्वात सुरक्षित आणि असुरक्षित देशांबद्दल माहिती देतात.

 

 

सुरक्षित देशांच्या यादीमध्ये ते देश उच्चस्थानी आहेत, ज्यांच्याकडे चांगल्या संस्था आहेत. तसेच भ्रष्टाचार कमी आहे आणि पायाभूत सुविधा चांगल्या आहेत, योग्य सुरक्षा आहे. त्यामुळे ते देश प्रवासासाठी सुरक्षित आहेत.

 

पालकमंत्री पदासाठी शिंदेंच्या मंत्र्याची अघोरी पूजा;महाराष्ट्रात खळबळ

जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे. 2008 पासून आइसलँडने हे स्थान कायम राखले आहे. जगातील 10 सर्वात सुरक्षित देशांमध्ये 8 देश युरोपमधील आहेत.

 

 

आशियामधील फक्त एक देश या यादीमध्ये आहे. Top 10 सुरक्षित देशांच्या यादीत आयर्लंड दुसऱ्या क्रमांकावर, न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर, ऑस्ट्रिया चौथ्या क्रमांकावर आणि स्वित्झर्लंड पाचव्या क्रमांकावर आहे.

 

महाराष्ट्रातील ‘या’ भागात २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

सिंगापूर हा आशियातील एकमेव देश सहाव्या स्थानावर आहे. पोर्तुगाल 7 व्या, डेन्मार्क 8 व्या, स्लोव्हेनिया 9 व्या आणि फिनलंड 10 व्या स्थानावर आहे.

 

 

ग्लोबल पीस इंडेक्स च्या रँकिंगमध्ये रशिया 163 देशांमध्ये सर्वात खाली आहे. त्यामुळे रशिया हा जगातील सर्वात असुरक्षित देश आहे. युक्रेन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

आणखीन एक मोठा विमान अपघात टळला

सुदान तिसऱ्या क्रमांकावर आणि आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो चौथ्या क्रमांकावर आहे. मध्य पूर्वेत हिंसाचारात सापडलेला येमेन पाचव्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान सहाव्या क्रमांकावर, सीरिया 7 व्या, दक्षिण सुदान 8 व्या, इस्रायल 9 व्या आणि माली 10 व्या स्थानावर आहे.

 

 

या यादीत भारताचा क्रमांक 115 वा आहे. गेल्या वर्षीही भारत याच क्रमांकावर होता. पाकिस्तानची रँकिंग सुधारली आहे. पाकिस्तान एका अंकाने सुधारून 144 व्या स्थानावर पोहोचला आहे. तुर्की 146 व्या क्रमांकावर आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *