जागृत शनी मंदिर व जैन मंदिराच्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
Jagurt Shani Temple and Jain Temple Road is the kingdom of dirt

पूर्णा-शेख तौफिक
परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरांमध्ये महावीर नगर परिसरातील जागृत शनी मंदिर व जैन मंदिर भागात नालीतील घाण पाणी रस्त्यावर येत असून
या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपरिषद पूर्णा यांचेकडून सफाईकर्मी दुर्लक्ष करीत असून जनतेत नाराजी व्यक्त होत आहे. मंदिराला येणाऱ्या भाविक भक्त त्यासह
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना या नालीतील येणाऱ्या घाण पाणीचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. भाविक भक्तांना आपण पवित्र ठिकाणी जात असलो तरीही पूर्णा नगरपरिषदेच्या गलथान कारभाराचा फटका
मात्र सर्वसामान्य भाविक भक्तांना नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे नगरपरिषद याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत नाही ना असा प्रश्न जनतेला पडला आहे.
मुख्याधिकारी , स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी यांनि याकडे लक्ष देऊन भाविकांची या घाणीपासून सुटका करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.









