मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात ,अजितदादा, एकनाथ शिंदे पेक्षा शरद पवार भारी ; तोंडभरून कौतुक
Chief Minister Fadnavis says, Sharad Pawar is stronger than Ajitdada, Eknath Shinde; Praises him profusely

महायुती सरकार स्थापन झाल्यापासून काही ना काही खडखड तिन्ही पक्षात होताना दिसत आहे ,राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय महाराष्ट्रातील जनतेला 2019 पासून सातत्याने येत आहे.
कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येत युती आणि आघाड्या केल्यामुळे राजकारणात काहीही शक्य आहे, असे बोलले जाते. सध्याच्या राज्याच्या राजकारणातही असाच काहीसा प्रवाह पाहायला मिळत आहे.
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय विरोधकांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले.
हे सुद्धा वाचा;…..Bollywood News; Shahrukh Khan;ऑर्थर रोड जेलमध्ये असतांना शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काय खात असे ?
शरद पवार यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला आवडतात, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, जय-पराजयाची तमा न बाळगता पवार सातत्याने काम करत राहतात, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष आहे, असेही त्यांनी नमूद केले.
तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद तितका प्रभावी नसल्याचेही स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात म्हटले आहे की, “शरद पवारांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. पण काही गोष्टी अशाही आहेत,
हे सुद्धा वाचा;…..WEATHER ALERT;हवामान विभागाने सांगितले ,जूनमध्ये किती पाऊस पडणार
ज्या मी स्वीकारत नाही. पण मी त्यांच्या सातत्याचे कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात, असे वक्त्यव्य त्यांनी केले आहे.
तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगलं आहे? याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत,
हे सुद्धा वाचा;…..Maharashtra Cabinet Decision; मंत्रिमंडळ निर्णय; 27 मे , 2025
असे म्हणत त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्रुटी दाखवली आहे. अर्थात हे दोघे या मताबाबत आपल्याला माफ करतील, असे देखील वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान परवा अजितदादांवर शिवसेनेचे आमदार, मंत्री नाराज असतात हे आपण अनेकदा पाहिलं आहे. पण 132 आमदार असलेल्या, मुख्यमंत्रीपद असलेल्या, केंद्रात सत्ता असलेल्या,
मोदी शाहांच्या सर्वशक्तिशाली भारतीय जनता पक्षाचे आमदारसुद्धा अजितदादांमुळे त्रस्त आहेत. त्यांनी नांदेडच्या सभेतच फडणवीस-बावनकुळेंकडे तक्रार केली. या दोघांनी तिथल्या तिथे ती अमित शाहांकडे फॉरवर्ड केली
हे सुद्धा वाचा;…..narayan rane;राणेंनी केली उद्धव ठाकरे,राज ठाकरेंवर टीका,संजय राऊत म्हणाले; वय झालं, टोपाचे केसही पिकलेत, त्याचं भान ठेवा
देशाचे गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले. जाता जाता मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. आधी अजित पवार आणि नंतर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली. कोणी म्हणालं मुंबई महापालिकेबाबत चर्चा झाली,
कोणी म्हणालं मंत्रिपदावरुन चर्चा झाली.. पण नेमकी काय चर्चा झाली ते कधीच समोर येणार नाही. त्यावरुन वेगवेगळे कयास फक्त पत्रकारच नाही तर राजकारणी सु्द्धा बांधत आहेत.
हे सुद्धा वाचा;….. political news;महायुतीत तणाव;अजितदादांच्या माजी मंत्र्याला बावनकुळेंनी सुनावले
मुंबईत शाहांसोबत भाऊ-दादा-भाई यांची काय चर्चा झाली याचा अंदाज बांधणं कठीण असलं तरी नांदेडमध्ये काय झालं याची मात्र चर्चा समोर येत आहे.
नांदेडच्या सभेदरम्यान भाजपच्या काही आमदारांनी अमित शाहांकडे तक्रार केली. तक्रार साधी सुधी नाही तर चक्क उपमुख्यमंत्री अजित पवारांची तक्रार केली.







