सोशल मीडिया वर घातली बंदी तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

Social media banned, youth enter Parliament, 5 protesters die

 

 

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी आज सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. नेपाळच्या काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली.

 

नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटरसह 26 सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलीये. नेपाळच्या संसद परिसरात जाऊन तरूणांनी आंदोलन केलं. धक्कादायक म्हणजे 5 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी , हालचालींना वेग

नेपाळमध्ये हजारो Gen-Z मुले-मुली सरकारच्या रस्त्यावर उतरले आहेत. आज आंदोलकांनी नेपाळच्या संसदेत प्रवेश केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याची फवारणीही केली.

 

यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर येत आहे. सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता नेपाळ सरकारने आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे.

शबाना महमूद ब्रिटनच्या गृहसचिवपदावर ,शबाना महमूद आहेत तरी कोण?

त्याचवेळी, पोलिसांनी काठमांडूमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. काठमांडूमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सैन्य तैनात करण्यात आले आहे.

 

नेपाळ पोलिसांच्या मते, 12 हजारांहून अधिक निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी संसदेच्या गेट क्रमांक 1 आणि 2 वर कब्जा केला.

आरक्षण हायकोर्टात जाण्याची शक्यता,मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय

संसद भवनासोबतच, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाजवळ सैन्य तैनात करण्यात आले आहे. 3 सप्टेंबर रोजी नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

 

हे प्लॅटफॉर्म नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणीकृत नव्हते. मंत्रालयाने त्यांना 28 ऑगस्टपासून 7 दिवसांची मुदत दिली होती. त्याची अंतिम मुदत 2 सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना १०-१० लाखांची मदत

नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटरसह 26 सोशल मीडियावर बंदी, संपूर्ण यादी-
मेटा प्लॅटफॉर्म: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप.

व्हिडिओ आणि इमेज शेअरिंग: यूट्यूब, स्नॅपचॅट आणि पिंटरेस्ट.

व्यावसायिक नेटवर्किंग: लिंक्डइन.

 

 

बातम्या आणि सोशल नेटवर्किंग: एक्स (पूर्वी ट्विटर) आणि रेडिट.

इतर प्लॅटफॉर्म: डिस्कॉर्ड, सिग्नल, थ्रेड्स, वीचॅट, क्वोरा, टम्बलर,

आघाडीकडून भाजपा आणि नितीश कुमार यांना रोखण्यासाठी बिहारमध्ये मोठा निर्णय

 

क्लबहाऊस, मास्टोडॉन, रंबल, मीवी, व्हीके, लाइन, इमो, झालो, सोल, बोटिम आणि हॅम्रो पॅट्रो.

मेसेजिंग अॅप्स: ऑनलाइन फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या चिंतेमुळे जुलै 2025 मध्ये टेलिग्रामवर देखील बंदी घालण्यात आली होती.

अमेरिकेत याल तर खबरदार,भारतीयांना इशाऱ्याने खळबळ

Related Articles