देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी 8 कोटींची लाच ,दोघांना रंगेहाथ अटक
The biggest bribe of 8 crores in the country's history, two arrested red-handed

पुण्यामध्ये तब्बल 8 कोटी रुपयांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील धनकवडीमधील एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेत हा प्रकार घडला आहे.
परभणीत दोन कार चा भीषण अपघात, 3 ठार 2 जखमी
३३ नवीन सभासदांना शेअर सर्टिफिकेट देणे व भविष्यातील लिलावात हवी ती व्यक्ती विजयी करून देण्यासाठी सहकार विभागाने नेमलेल्या लिक्विडेटर व माजी प्रशासकाने
तब्बल 8 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. तडजोडीअंती 30 लाख रुपये अॅडव्हान्स स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले.
चर्चा सोन्याची, पण भाव खाल्ला चांदीने
सध्याचे लिक्विडेटर विनोद माणिकराव देशमुख (वय 50) आणि माजी प्रशासक आणि सरकारी पॅनेल ऑडिटर भास्कर राजाराम पोळ (वय 56) या दोन्ही आरोपींविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन 2005 मध्ये 61 वर्षीय तक्रारदारासह 33 जणांनी जुन्या सभासदांकडून शेअर्स खरेदी करून या सोसायटीचे सभासदत्व घेतले होते. 2020 मध्ये सभासदत्वावरून वाद निर्माण झाल्याने सहकार विभागाने सोसायटीवर प्रशासक नेमला.
काँग्रेसच्या पराभवासाठी भाजपने केला अमेरिकेच्या CIAआणि इस्राईलच्या मोसादचा वापर ?
नंतर 2024 मध्ये सोसायटी लिक्विडेशनमध्ये काढण्यात आली आणि विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नियुक्ती झाली. तक्रारदार व इतर 32 सभासदांनी 2023 मध्ये
तत्कालीन प्रशासक भास्कर पोळ यांच्याकडे शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. पोळ यांनी इतर 32 जणांचे अर्ज निकाली काढले, मात्र तक्रारदार सुनावणीस हजर नसल्याने त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवला.
डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा आदेश ,आता या 19 देशातील नागरिकांना अमेरिकेत नो एन्ट्री
सप्टेंबर 2025 मध्ये तक्रारदार पोळ यांच्याकडे चौकशीस गेले असता पोळ यांनी स्वतःसाठी व सध्याचे लिक्विडेटर देशमुख यांच्यासाठी 3 कोटी, तर भावी लिलावात तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीला मालमत्ता देण्यासाठी 5 कोटी अशी एकूण 8 कोटी रुपयांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदारांनी 5 डिसेंबर 2025 रोजी पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने प्रथम लाचेची पडताळणी केली व त्यात 8 कोटींची मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले.
अजित पवारांच्या मुलाचे लग्न परदेशात;राष्ट्रवादीच्या केवळ दोन नेत्यांनाच निमंत्रण
तडजोडीअंती 30 लाख रुपये अॅडव्हान्स ठरले. एसीबीने शनिवार पेठेतील तक्रारदारांच्या ऑफिससमोर देशमुख स्वतः पैसे घेण्यासाठी हजर झाले. त्यांनी पंचांसमोर 30 लाखांची रोख रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली.
तलाठ्यांकडे चकरा मारण्याची झंझट संपली ;आता डायरेक्ट मिळवा 7/12
एसीबी अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुणे विभागातील सहकारी संस्थांच्या लिक्विडेशन प्रक्रियेत एवढ्या प्रचंड रकमेची लाच मागितल्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे.








