महायुती सरकारच्या मंत्र्यांचा राजीनामा

Resignation of ministers of the grand alliance government

 

 

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यापल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा संदर्भ देत खातेबदल पत्रावर मंजुरी दिली आहे.

 

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शक्तिपीठ चा मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत घोषणा

मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे.

 

या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा! आम्ही मात्र मंत्री संजय शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत असे रोहित पवार म्हणाले.

 

मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय असल्याचे रोहित पवार म्हणाले.

पुन्हा एका देशाने लावला भारतावर टेरिफ ; देशभरात खळबळ

वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे हे दाखवून द्यायला हवं होतं.

 

यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे.

 

राज्यावर मोठे संकट, भारतीय हवामान विभागाकडून थंडीचा अलर्ट जारी
असो! या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा! आम्ही मात्र मंत्री शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत असे सूचक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

 

त्यामुळं आता विरोधकांचा मोर्चा माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे वळणार असल्याचं बोललं जात आहे.

 

ठाकरे बंधूच्या युतीबाबत घोषणेची मोठी अपडेट समोर
नाशिक सत्र न्यायालयाने काल (मंगळवारी, ता 16) सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती.

 

यामुळं माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. विरोधी पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते.

अमेरिकेत या 39 देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर बंदी

कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद काढून घेतलं आहे. माणिकराव कोकाटेंची खाती अजित पवारांकडे वर्ग करण्यात आल्याने ते आता बिन खात्याचे मंत्री बनले आहेत.

या महापालिकेच्या निवडणुकीला ब्रेक?

क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग ही खाती अजित पवारांकडे सोपवली गेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र दिल्यानंतर राज्यपालांकडूनही त्यास मंजुरी देण्यात आली.

 

दरम्यान माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना रुग्णालयातूनच अटक केली जाणार का,

 

याबाबत चर्चा रंगली असून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागवली आहे.

 

कोकाटेंची सध्याची वैद्यकीय स्थिती, डॉक्टरांचा अहवाल आणि कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी केली जात आहे. कायदेशीर पडताळणी केल्यानंतर नाशिक पोलीस पुढील निर्णय घेणार आहेत.

 

दरम्यान, या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. विजय कोकाटे सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने नाशिक पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

 

1995 साली कागदपत्रांची फेरफार करून शासकीय सदनिका मिळवल्याचा आरोप कोकाटे बंधूंवर आहे. या प्रकरणात दोघांनाही दोन वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला असून,

 

जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटे बंधूंच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या रुग्णालयातील उपचारांमुळे पोलिसांची पावले थोडी थांबलेली असली,

 

तरी दुसरीकडे विजय कोकाटेंच्या शोधासाठी हालचाली अधिक तीव्र झाल्या आहेत. तर, कायदेशीर पडताळणीनंतर नाशिक पोलीस नेमका काय निर्णय घेतात,

 

माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार का आणि विजय कोकाटे पोलिसांच्या हाती लागतात का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 

Related Articles