उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी तिघे उत्सुक
Three candidates from Uddhav Thackeray's Shiv Sena are eager for Rajya Sabha

राज्यसभेची उमेदवारी मिळण्याआधीच ठाकरे यांच्या शिवसेनेत उमेदवारी मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत राजन विचारे,
टीईटी नापास गुरुजींना मोठा झटका!
अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे राज्यसभा उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी मधून एकच जागा राज्यसभेसाठी जाणार असल्याने तिन्ही पक्ष आपला उमेदवार जावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शरद पवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले असताना ठाकरेंच्या शिवसेनेत एकाच जागेसाठी उमेदवारी पक्षाला मिळण्याआधीच ही परिस्थिती पाहायला मिळत आहे.
अजित दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा सरकारला गंभीर इशारा
विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे.
यामधील काही जणांनी आपली इच्छा उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्याची माहिती आहे. एकीकडे शरद पवारांचे नाव उमेदवारीसाठी समोर असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा एक खासदार, तीन माजी खासदार आणि एक माजी विरोधी पक्षनेत्याचा नाव इच्छुक म्हणून समोर येत आहे.
विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती
ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद नसल्याने राजन विचारे यांचा विचार व्हावा तर छत्रपती संभाजी नगरमध्ये शिंदे शिवसेना आणि भाजपची ताकद असल्याने एकेकाळी असलेल्या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आपली ताकद वाढावी यासाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे इच्छुक आहेत.
दुसरीकडे कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतिनिधित्व राहावं यासाठी माजी खासदार विनायक राऊत इच्छुक आहेत. मात्र ही जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडणार? त्यानंतर उमेदवारी संदर्भात तिन्ही पक्षाकडून विचार केला जाणार आहे.
शिवशाही एसी बस बंद होणार
आदित्य ठाकरे यांना दोन वेळा राज्यसभेच्या बैठकीला बोलावण्यात आलं होतं, मात्र आदित्य ठाकरे बैठकीला गेले नाहीत. राज्यसभेची एक जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम आहेत.
मात्र मविआ म्हणून विधानभवनात बैठक बोलावण्यात आली. मात्र या बैठकीला केवळ शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्यांनी बैठकीला दांडी मारली आहे.
राज्यसभेसाठी भाजपकडू रामदास आठवलेंचं नाव निश्चित?ऐनवेळी दोन नवीन नावं
महाराष्ट्रातील एकूण सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वात मोठे नाव आहे.
त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार धैर्यशील मोहन पाटील यांचाही समावेश आहे.
रोहित पवार आक्रमक;पोहोचले थेट ठाण्यात पण पोलिसांचा FIR दाखल करण्यास नकार
तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार डॉ. फौजिया खान हे सर्वजण एकाच दिवशी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.








