विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती

Shocking information about the plane crash

 

 

झारखंडच्या रांची येथील विमानतळावरून उड्डाण केलेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात कोणीही वाचू शकले नाही. विमानाचा संपर्क तुटताच तपास यंत्रणा विमानाचा शोध घेत होत्या.

अजित दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा सरकारला गंभीर इशारा

खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ज्या भागात हे विमान कोसळले, त्याठिकाणी वातावरण अचानक बदलले आणि हा अपघात झाला असावा,

 

असा प्राथमिक अंदाज आहे. या खासगी चार्टर्ड रुग्णवाहिका विमानाने सायंकाळी 7 .11 दरम्यान उड्डाण भरली. मात्र, विमानाची काही वेळातच संपर्क तुटला. रांचीहून दिल्लीकडे हे विमान निघाले होते.

पुढील 24 तासात हवामानात होणार मोठा बदल

विमानातील 7 ही जणांचा या अपघाता मृत्यू झाला. विमानाचा शेवटचा संपर्क 7 वाजून 34 मिनिटाला झाला, त्यानंतर विमानासोबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

 

वाराणसी हवाई हद्दीत विमान काही वेळ होते पण त्याचा संपर्क होऊ शकला नाही. झारखंडमधील चतरा आणि सिमरियाच्या सीमावर्ती भागात विमान कोसळल्याचे आढळून आले.

 

या विमान अपघाताबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे. ज्या विमानाचा अपघात झाला ते एक खासगी चार्टर्ड रुग्णवाहिका विमान होते. या विमानात एकाच कुटुंबातील चार व्यक्ती होते.

अजित पवारांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी पोस्ट, 7.30 मिनिटांनी डिलीट…;

रांची येथून ते उपचारासाठी दिल्ली येथे जात होते. मिळालेली अधिकची माहिती अशी की, कॅप्टन विवेक भगत, कॅप्टन सवराजदीप सिंह यांच्यासोबत रूग्ण संजय कुमार, यांच्यासोबत धुरू कुमार आणि अर्चना देवी होते.

 

यासोबतच डॉक्टर सचिन मिश्रा आणि विकास गुप्ता विमानात होते. याबाबत माहिती देताना देवकमल रूग्णालयाचे डॉक्टर सिन्हा यांनी म्हटले की, रूग्ण संजय कुमार यांच्या पुढील उपचारासाठी त्यांना दिल्ली येथे घेऊन गेले जात होते.

 

संजय कुमार खूप जास्त जळाले होते. 65 टक्के ते जळाले असल्याने मागील 7 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते मुळ बिहार येथे रहिवासी होते.

IT कंपन्यांना बुरे दिन, पाच दिवसात 3 लाख कोटी गमावले

दिल्लीला त्यांना घेऊ जाण्याकरिता खासगी चार्टर्ड रुग्णवाहिका विमान होती. 16 जानेवारी 2026 रोजी एका आगीच्या घटनेत ते जळाले होते. त्यांच्यावर आमच्याकडे उपचार सुरू होते,

 

त्यानंतर त्यांना दिल्ली येथील रूग्णालयात उपचारासाठी सल्ला दिला. आता एकाच कुटुंबातील 4 जण या विमान अपघातात गेल्याची माहिती आहे.

पहिल्या शासकीय कार्यक्रमात भाषण करतांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक

 

Related Articles