इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र महाप्रहार

Israel launches missile strike on Iran

 

 

मध्यपूर्वेतील तणाव आता एका अशा वळणावर आला आहे जिथून मागे परतणे अशक्य वाटते. आज शनिवारी इस्रायलने इराणविरुद्ध थेट आणि ‘पूर्ण युद्ध’ सुरू केल्याची घोषणा केली.

 

इस्रायली हवाई दलाने अमेरिकेच्या सक्रिय पाठिंब्याने इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला आहे. या हल्ल्याचे सर्वात मोठे आणि धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे इस्रायलने थेट इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या अधिकृत निवासस्थानाला आणि कार्यालयाला लक्ष्य केले.

 

जमहूरी स्ट्रीटवरील हे निवासस्थान या हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, खामेनी यांच्या जीवावर बेतण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

‘ISNA’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्याचा धोका ओळखून अली खामेनी यांनी काही वेळ आधीच आपले निवासस्थान सोडले होते.

 

सध्या त्यांना एका गुप्त आणि अत्यंत सुरक्षित अशा दुर्गम बंकरमध्ये हलवण्यात आले आहे. ज्या निवासस्थानावर हल्ला झाला, त्याचे नियंत्रण सध्या त्यांचा धाकटा मुलगा मोजतबा याच्याकडे आहे.

 

मोजतबा हेच सध्या सर्वोच्च नेत्याच्या वतीने सर्व महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. या हल्ल्यापूर्वी इराणमधील विरोधी गट ‘पीपल्स मुजाहिदीन’च्या लढाऊंनीही या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता,

 

जो सुरक्षा दलांनी मोडून काढला होता. मात्र, इस्रायली क्षेपणास्त्रांनी हे सुरक्षित मानले जाणारे ठिकाण चकाचक करून टाकले.

 

इस्रायली माध्यम ‘येदियोथ अहरोनोथ’च्या अहवालानुसार, हा केवळ लष्करी तळांवरील हल्ला नव्हता. तेल अवीव आणि वॉशिंग्टनने मिळून इराणची महत्त्वाची मंत्रालये आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती.

 

इस्लामिक रिपब्लिकच्या सर्व सुरक्षा प्रतिष्ठानांना मुळासकट नष्ट करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. अमेरिकेने या हल्ल्यात इंटेलिजन्स

 

आणि लॉजिस्टिक सपोर्ट देऊन इस्रायलची ताकद दुपटीने वाढवली आहे, ज्यामुळे तेहरानमधील अभेद्य मानली जाणारी सुरक्षा यंत्रणा पत्त्यासारखी कोसळली.

 

 

आपल्या सर्वोच्च नेत्याच्या निवासस्थानावर झालेल्या या हल्ल्यामुळे इराणमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. रॉयटर्सशी बोलताना एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितले की,

 

“इस्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता शब्दांची वेळ संपली असून कृतीची वेळ आली आहे. आम्ही या हल्ल्याला अत्यंत विनाशकारी प्रत्युत्तर देऊ आणि हे प्रत्युत्तर तात्काळ असेल.”

 

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी (IRGC) आधीच क्षेपणास्त्र युनिट्सना हाय अलर्टवर ठेवले असून, इस्रायलच्या तेल अवीव आणि हायफा सारख्या शहरांवर प्रतिहल्ला होण्याची दाट शक्यता आहे.

 

हल्ल्यानंतर तेहरानमधील जोमहौरी स्ट्रीट आणि आसपासच्या परिसरात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अनेकजण शहराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले असले तरी, ज्या प्रकारे थेट सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करण्यात आले आहे, ते पाहता मध्यपूर्वेतील हे युद्ध आता जागतिक महायुद्धाचे रूप घेऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

Related Articles