आरोप करणाऱ्या रोहित पवारांवर तटकरेंचा पलटवार
Tatkare's counterattack on Rohit Pawar, who made the accusations

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा अपघात झाला नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला.
इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र महाप्रहार
तसंच त्यांनी नाव न घेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांवरही निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर आज बारामती इथं पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार पलटवार केला असून
2019 मध्ये कोण भाजपकडे तिकीट मागायला गेले होते, हे आम्हाला माहीत आहे, असं म्हणत नाव न घेता रोहित पवारांना फटकारलं आहे.
जगात भारताची अब्रू घालणारे हे आहे ‘गलगोटिया विद्यापीठ
सुनील तटकरे म्हणाले की, “टीका टिप्पणी होत असते. यापूर्वी दादांबद्दल कोण काय बोलले आहे, हे सर्वांना माहिती आहे. जनसन्मान यात्रेनिमित्त स्वत: अजितदादा बारामतीतच म्हणाले होते की, मी कुटुंबात एकटा पडलो आहे.
2019 ला कोण भाजपकडे तिकीट मागायला गेले होते, हे मला आणि दादांना माहिती होतं. त्यामुळे कोण काय बोलतंय, याबद्दल मला काही वाटत नाही,” अशा शब्दांत तटकरे यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“अजितदादांचा आणि माझा 40 वर्षांचा प्रवास आहे. त्यांच्या अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे कोण काय बोलतं याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे.
जगात भारताची अब्रू घालणारे हे आहे ‘गलगोटिया विद्यापीठ
कोणालाही काही आरोप करायचे असतील तर त्यांनी स्पष्टपणे नाव घेऊन बोलावे. जो कोणी बोलतो, त्याने नाव घेऊन बोलावे. अस्पष्ट विधानांचा काही उपयोग नाही,” असा टोलाही सुनील तटकरे यांनी लगावला आहे.
“सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे की, विमान अपघाताबाबत चौकशी व्हावी. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांनीही चौकशीचे आदेश दिले आणि त्याची चौकशी सुरू झाली आहे.
राज्यसभा निवडणुक ;उद्धव ठाकरें आणि काँग्रेस, शरद पवारांपासून चार हात दूर ,थेट दिल्लीत हालचाली
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि पक्षाच्या वतीने निवेदन देत चौकशी व्हावी अशी मागणी केली.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील चौकशीची मागणी केली असून सीबीआयद्वारे चौकशी सुरू आहे. दादांबद्दल सर्वांनाच हळहळ वाटत आहे. त्यामुळे लवकरात लवकर घटनेचा तपास लागावा, ही सर्वांची मागणी आहे,” असं तटकरे म्हणाले.
जगात भारताची अब्रू घालणारे हे आहे ‘गलगोटिया विद्यापीठ









