पार्थ पवार म्हणाले आता ‘काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल…ऐकुन ‘शरद पवार हसले

Parth Pawar remarked, "Now, the Congress will face a downfall in Maharashtra"—upon hearing this, Sharad Pawar smiled.

 

 

बारामतीच्या पोटनिवडणुकीत विनंती करुनही काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीशी नाराजी आहे.

 

याच मुद्द्यावरुन अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी तीव्र नाराजी बोलून दाखवली होती. सुनेत्रा पवारयांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उतरवणे म्हणजे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे,

देशांत युद्धामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर काहीवेळातच झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एकप्रकारे आपल्या नातवाचे कान टोचून त्याचे हवेतील विमान जमिनीवर आणले.

शरद पवार यांना पत्रकार परिषदेत पार्थ पवार यांच्या काँग्रेसविषयीच्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. संजय राऊत बोलतात की, काँग्रेसने स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे.

 

पार्थ पवारांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की, काँग्रेसचा आता डाऊनफॉल सुरु होईल, त्यांनी उमेदवारी अर्ज भरुन चूक केली, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा शरद पवार थोडावेळ थांबले.

उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

त्यानंतर काहीशा छद्मीपणे हसून त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर स्टेटमेंट करायला एकप्रकारची परिपक्वता लागते.

 

ती कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही. हे वक्तव्य करुन शरद पवार यांनी पार्थ पवार यांना कोणतेही राजकीय भाष्य करताना ते जबाबदारीने आणि तर्कसंगत करावे, अशा अप्रत्यक्ष संदेश दिल्याची चर्चा आहे. यावर आता पार्थ पवार काही प्रतिक्रिया देणार का, हे बघावे लागेल.

 

 

माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला (त्यांना) कळायला पाहिजे काय करायचं ते. त्यांच्या (काँग्रेसच्या) राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला नाही माहिती. सगळे मोठे लोक आहेत,

राज्यावर संकट ,आज पावसाचा इशारा ,या जिल्ह्यात अलर्ट जारी

सर्वांना माहिती आहे काय चाललंय. त्यांनी (काँग्रेसने) विचार केला असेल तर करु द्या. पण त्यांना (काँग्रेसला) नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत थेट इशाराच दिलाय.

 

लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही.

 

जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असेही पार्थ पवार यांनी म्हटलंमंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याला लाच घेताना बेड्या ठोकल्या

 

दरम्यान या मुद्द्यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उतरवणे म्हणजे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे, असे त्यांनी म्हटले.

 

यानंतर शरद पवार यांनी पार्थ पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “राजकारणात महत्त्वाच्या निर्णयांवर मत व्यक्त करण्यासाठी एक विशिष्ट परिपक्वता लागते. ती कितपत आहे, हे मी आत्ता सांगू शकत नाही,” असे ते म्हणाले. तसेच, “काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

 

त्यांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्याचे काही कारण नाही. बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा ठेवणेही योग्य नाही,” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधलाय.

 

संजय राऊत म्हणाले की, मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम केले आहे. पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा ही काँग्रेसचीच राहिलेली आहे. काँग्रेससोबतच त्यांनी त्यांचे पुढचे राजकारण केले आहे.

 

शरद पवार म्हणताय की, काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस ती जागा कौटुंबिक कारणामुळे लढत नाहीये. याचा अर्थ ती जागा दुसरी कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही.

 

लोकशाहीमध्ये जर कोणी निवडणूक लढत असेल तर त्याला विरोध कशाला करावा? लढू नको म्हणत दबाव कशाकरता आणायचा? पार्थ पवार यांचे वडील अजितदादांनी देखील लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवडची निवडणूक लढली होती. काँग्रेसच्या मदतीने ते निवडणूक लढले होते. हा अलीकडचाच इतिहास आहे, असे म्हणत त्यांनी पार्थ पवारांवर निशाणा साधला.

 

राहुरीत प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असणार होते. मात्र भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, समजावून कोणीही सांगत नाही. धमक्या दिल्या जातात.

 

साखर कारखाना, सहकारी संस्था, बँकांचे व्यवहार याबाबत कोणी समजावून वगैरे सांगत नाही. समजावून सांगायचं असं कुठलं मोठं क्रांतिकारक काम आहे? समजावून सांगायला विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण गेले, ते किती मोठे क्रांतिकारक आहेत? स्वातंत्र्य चळवळीतील सेनानी आहेत का? तनपुरे देखील महान सामाजिक कार्यकर्ते आहेत का? राधाकृष्ण विखे पाटलांवर किती आरोप आहेत. अलीकडेच त्यांचे जमिनीचे प्रकरण आलेले आहे.

 

रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटल्याचे आरोप जाहीरपणे होत आहेत आणि हे काय समजावून सांगणार? हे धमक्या द्यायला जातात. हे फाईल घेऊन जातात. माघार घ्या, लढू नका नाहीतर कारखान्याला नोटीस मारू. जे या धमक्यांना घाबरतात ते मागे जातात. सध्याच्या राजकारणात तुम्हाला लढावे लागते.

 

संघर्ष करावा लागतो नाहीतर तुम्ही राजकारण करू नका. तुम्ही भाजपचे गुलाम म्हणून आयुष्यभर जगा. गळ्यात आम्ही भाजपच्या धमकी सत्राचे गुलाम आहोत, हे महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या लोकांनी सांगावं. पण आम्हाला हे मान्य नाही. आम्ही भाजपला घाबरत नाही. भाजपच्या दहशतीला घाबरत नाही. या देशात लोकशाही आहे. या देशात ट्रम्पशाही सुरू नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

 

सुनेत्रा पवार यांना शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मला वाटत नाही की त्यांना महाविकास आघाडीतून कोणी पाठिंबा दिलेला आहे. आमच्या त्यांच्या कुटुंबाविषयी सद्भावना आहेत.

 

शरद पवारांनी कौटुंबिक कारणाने बारामतीत आपला उमेदवार दिलेला नाही. उद्धव ठाकरेंशी चर्चा झाल्यावर त्यांनी देखील सद्भावना व्यक्त केल्या. पण, काँग्रेस हा महाविकास आघाडीतील स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची भूमिका लढण्याची असेल तर त्यांनी उमेदवार दिलेला आहे.

 

उमेदवार देताना त्यांनी एक अट टाकली आहे की, उमेदवार मागे घेण्याची तुमची विनंती आम्ही स्वीकारली तर अजित पवार यांच्या संशयास्पद अपघातासंदर्भात गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा, असे त्यांनी म्हटले. तर बारामतीची निवडणूक ही कोणत्याही प्रचाराच्या रणधुमाळी शिवाय चालेल. बारामतीचे मतदार शांतपणे आपली भूमिका मतपेटीतून व्यक्त करतील, असे देखील संजय राऊत म्हणाले.

 

 

Related Articles