अशोक खरातचा इन्काउंटर होणार , रोहित पवारांनी भविष्यवाणी
Ashok Kharat to Face Encounter: Rohit Pawar Predicts

लैंगिक अत्याचार आणि फसवणूक प्रकरणी भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे. पण, या खरातने आता आपल्या मरणाची भविष्यवाणी केल्याचं समोर आलं आहे.
प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात मोठा बदल केला
पण “खरातला इतक्या गोष्टी माहित आहेत, इतक्या नेत्यांची नाव माहित आहेत. 28 जानेवारीला दादाचा त्या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला. या तीन दिवसात त्याच्या बँक अकाउंटमध्ये एवढी मोठी उलाढाल झाली कशी? त्याच्याबरोबर कोण नेता कशासाठी तिथे येत होता.
या सगळ्या गोष्टी खरातला माहीत असल्यामुळे आम्हाला असं वाटतं, उद्या त्याने आत्महत्या केली असं दाखवलं जाईल, नाहीतर एन्काऊंटरमध्ये त्याला मारला जाईल’ असा संशय राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
मंदिरात चेंगराचेंगरी; 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू
“खरात ज्या पद्धतीने काम करत होता, त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. पण खरातला इतक्या गोष्टी माहित आहेत इतक्या नेत्यांची नाव माहित आहेत. 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी या तीन महत्त्वाच्या दिवशी,
कारण 28 जानेवारीला दादाचा त्या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला. या तीन दिवसात त्याच्या बँक अकाउंटमध्ये एवढी मोठी उलाढाल झाली कशी? त्याच्याबरोबर कोण नेता कशासाठी तिथे येत होता.
रविवार असतानाही तब्बल १०३ निर्णय जाहीर
या सगळ्या गोष्टी खरातला माहीत असल्यामुळे आम्हाला असं वाटतं उद्या त्याने आत्महत्या केली असं दाखवलं जाईल, नाहीतर एन्काऊंटरमध्ये त्याला मारला जाईल असा संशय आम्हाला वाटतो’ असं रोहित पवार म्हणाले.
तसंच, “बदलापूरमध्ये एका शाळेत मुलीवर अत्याचार झाला त्यावेळी एका अक्षय शिंदे नावाच्या तरुणाला पकडलं, मात्र त्याकडे बरीच माहिती होती तो मालक काय करत होता, किती मुलींवर याच्या आधी अत्याचार झाले होते
33 विदर्भ आणि मराठवाडा वर्षानंतर पहिला मोठा भूकंप
पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळण्या अगोदर त्या माणसाला त्या ठिकाणी खोट्या एन्काऊंटर मध्ये मारल्या गेलं अशी चर्चा आहे. खरातच्या बाबतीत अशी गोष्ट घडू नये, कारण खरातकडे भरपूर माहिती आहे”, असंही रोहित पवार यांनी आवर्जून सांगितलं.
त्याचा तपास त्या ठिकाणी करावा लागतो कधी काही गोष्टी खऱ्या असतात कधी कधी कार्यकर्ते भावनिक होऊन मेसेज त्या ठिकाणी देत असतात. जे खरं आहे ते खरं आहे, कुणी जर भावनिक पद्धतीने मुद्दामून वातावरण गढूळ करण्यासाठी ते करत असेल तर चुकीचं आहे’ अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाचा ईव्हीएमबाबत मोठा निर्णय
“खरात प्रकरण हलक्यात घेऊन चालणार नाही, खरा तो भोंदू बाबा आहे, त्याच्या सोबत असणारे जे सर्व नेते मंडळी होतेस ते तिथे जाऊन काय करत होते कशा प्रकारची पूजा करत होते.
सामान्य लोकांच्या आणि काही अधिकाऱ्यांच्या लोकांच्या घरातील पत्नीचे व्हिडीओ आपल्याला बाहेर बघायला मिळाले की मुद्दामून ते दिले गेले,
प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात मोठा बदल केला
का चुकून झाले ते सांगता येणार नाही’ पण जे नेते त्या ठिकाणी पूजा करत होते तिथे बाहुलीवर अंगठे कापले नाहीतर कुठलं तरी रक्त काढून आणि त्या बाहुलीवर टाकलं त्याचबरोबर इतर काही पूजा होत्या ते व्हिडिओ मात्र अजूनपर्यंत बाहेर आले नाहीत.
नाशिकमध्ये अधिकारी आणि नेत्यांचे व्हिडिओ काही महिलांबरोबरचे बाहेर आल्याचे आपल्या सगळ्यांना माहित आहे. ते आपल्यात लोकात आले नव्हते, मात्र त्यापेक्षा हनी ट्रॅप प्रकरण खूप गाजलं होतं. त्यानंतर त्या प्रकरणाचं दुर्दैवाने झालं का हे कोणालाच माहित नाही, असंही रोहित पवार म्हणाले ‘
भोंदू अशोक खरातच्या टार्गेटवर थेट शरद पवार? दाव्याने राज्यात खळबळ
” हे व्हिडिओ जातात कुठं या व्हिडिओचा वापर कुठेतरी नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो का? अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला जातो का? व्हिडिओ आहेत पण दोन प्रकारांचे व्हिडिओ आहेत, खरा ज्या पद्धतीने महिलांचा अत्याचार करायचा ती चुकीची गोष्ट आहे,
ते व्हिडिओ काही प्रमाणात आपल्यासमोर सर्वांसमोर आले. सगळेच व्हिडिओ तसे आहेत, असं नाही मात्र काही व्हिडिओ असे आहेत की वेगळ्या पद्धतीने पूजा करणे, त्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो, त्या पद्धतीने पूजा करण्याचे व्हिडिओ नेत्यांचे मात्र दुर्दैवाने बाहेर आले नाही.
राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
पुरोगामी महाराष्ट्रात ब्लॅक मॅजिक जर काही नेते करत असेल तर ते नेते कोण, हे सरळपणे पुढे येणं फार महत्त्वाचा आहे. मात्र, ते अजून पर्यंत आला नाही. यासाठी समिती स्थापन केली आहे,
मात्र काही नेत्यांच्या काही गोष्टी बाहेर येत नाहीत. त्या व्हिडिओचा आणि माहितीचा उपयोग राजकीय दबाव आणण्यासाठी आणि काही लोकांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी सत्तेतला मोठा पक्ष भाजप करतो की काय अशी शंका त्या ठिकाणी निर्माण होते, अशी टीकाही रोहित पवारांनी केली.
जनगणना २०२७ मध्ये ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना
बारामतीमध्ये प्रचाराला जाणार आहे. अजित दादांकडे बघून नक्कीच त्या ठिकाणी, प्रचाराला जाईल फॉर्म भरायला बोलावलं नसलं, त्याच्याच बरोबर प्रचाराला बोलावलं नसलं तरी ही ही निवडणूक आताच्या उमेदवाराकडे बघून होती असं नाही. अजितदादांचं कार्य, अजितदादांची पद्धत स्टाईल आणि त्यांनी आजपर्यंत केलेलं कार्य या सगळ्या गोष्टीकडे बघून ही निवडणूक त्या ठिकाणी होते.
आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असेल, जी लीड अजितदादांना मिळायची त्या ठिकाणी सुनेत्रा काकींना मिळावी त्यांनी बोलावलं नाही तर नाही बोलवलं तरी आम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रचार करू, असंही रोहित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.
मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याला लाच घेताना बेड्या ठोकल्या








