VIDEO;दिल्ली विमानतळावर उड्डाणाच्या काही क्षणांपूर्वीच विमानाला आग

VIDEO: Fire Breaks Out on Aircraft Moments Before Takeoff at Delhi Airport

 

 

रविवारी पहाटे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात घटला आहे. स्वित्झर्लंडमधील झुरिचला जाणाऱ्या स्विस एअरलाइन्सच्या विमानाला उड्डाण करताना इंजिनमध्ये आग लागल्याची धक्कादायक बाब समोर आली.

संपामुळे मंत्रालयातील अर्धे कर्मचारी गैरहजर

उड्डाणापूर्वी ही आग लागल्याने एक मोठा विमान अपघात टळला. या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानात २२८ प्रवासी आणि चार लहान मुले होती. या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले.

 

मीडिया रिपोर्टनुसार, एअरबस ए३३० विमान, फ्लाइट एलएक्स १४७, पहाटे सुमारे १:०८ वाजता धावपट्टीवर उड्डाणासाठी सज्ज होते.

 

अचानक, त्याचे एक इंजिन बंद पडले आणि त्याला आग लागली. परिस्थिती लक्षात येताच, वैमानिकाने तात्काळ उड्डाण रद्द केले आणि एक मोठी दुर्घटना टळली.

ऐतिहासिक निर्णय: मंत्री आणि आमदारांच्या पगारात ५० टक्के कपात

या घटनेनंतर, सर्व प्रवाशांना आपत्कालीन स्लाईड्सच्या साहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानात २२८ प्रवासी आणि चार लहान मुले होती.

 

विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, परंतु सुरक्षा यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली.

 

 

घडलेल्या घटनेबाबत दिल्ली विमानतळ प्रशासनाने प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली विमानतळाने सांगितले, “आज पहाटे, दिल्ली विमानतळावरील रनवे २८/१० वर स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या फ्लाइट LX 147 (DEL-ZRH) संदर्भात संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची मध्यरात्री गुप्त भेट?

सर्व विहित सुरक्षा नियमावली तात्काळ लागू करण्यात आली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही.” अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

 

विमान अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एकीकडे जलद आणि सुरक्षित प्रवास म्हणून विमानसेवेकडे पाहिले जात असताना आणि लोकांचा कल वाढलेला असताना देखील विमान अपघात व दुरर्घटनेमध्ये वाढ होत आहे.

राहुल गांधीं RSS ला म्हणाले ‘राष्ट्रीय सरेंडर संघ’ काय घडले कारण ?

मागील आठवड्यामध्ये हैदराबादहून कर्नाटकातील हुबळीला जाणाऱ्या ‘फ्लाय ९१’ या विमानाला बंगळूरुमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ४०,००० फूट उंचीवर असताना, तांत्रिक बिघाडामुळे विमानात बिघाड झाला,

 

ज्यामुळे प्रवासी भयभीत झाले. विमान चार तास हवेत घिरट्या घालत होते. दिल्ली विमानतळावर, लेहहून येणारे स्पाईसजेटचे विमान टॅक्सीवेकडे येत असतानाच, अकासा एअरचे विमान हैदराबादला जाण्यासाठी धावपट्टीकडे येत होते.

 

दोन्ही विमानांच्या पंखांची टक्कर झाली. विमानतळावर विमान सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असताना, हे अपघात घडत आहेत.

अमेरिकेने आता चीनकडे मोर्चा वळवला! रशिया संतापला, भारताची सुद्धा चिंता वाढली;

Related Articles