देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची मध्यरात्री गुप्त भेट?
A Secret Midnight Meeting Between Devendra Fadnavis and Uddhav Thackeray?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ऐतिहासिक निर्णय: मंत्री आणि आमदारांच्या पगारात ५० टक्के कपात
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगला असलेल्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचा दावा काही माध्यमांकडून केला जात आहे. या भेटीवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क- वितर्क लढवले जात आहेत. या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
ही बातमी समोर आल्यानंतर ना ना तर्कवितर्क लढवले गेले. महत्त्वाची बाब म्हणेज खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता, त्यांनी आपल्याला याविषयी काही माहिती नाही,
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
फडणवीस आणि ठाकरे हेच त्यावर बोलतील, अशी प्रतिक्रीया दिली. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रीयेमुळे तर या प्रकरणात अधिकच सस्पेन्स तयार झाला.
अशातच यासंदर्भात थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना या भेटीविषयी माध्यमांनी प्रश्न केला. त्यावर फडणवीस यांनी स्पष्टपणे या भेटीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आम्हाला भेटायचं असेल तर ती लपून -छपून भेट घेण्याची आवश्यकता नाही. ती खुलेआमही होऊ शकते.
दीड कोटींच बिल मंजूर करण्यासाठी 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
लपवण्यासारखे असे कुठलेच विषय आमच्यामध्ये नाही. अशी कोणतीही भेट आमच्यात घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत आहेत.
आमची अशी कोणतीही भेट घडली नाही. काही लोक जाणीवपूर्वक आमच्या भेटीच्या खोट्या बातम्या देत आहेत, त्या खोटारड्या हँडल्सना नोटीस बजावली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.
अमेरिकेतील ४०% भारतीय देश सोडण्याच्या तयारीत
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास फडणवीस आणि ठाकरे यांच्यात भेट झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण या भेटीबाबत ठाकरे शिवसेना आणि फडणवीस यांच्याकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही भेट प्रत्यक्षात झाली की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.
भर मोर्चात महिलेने मंत्री गिरीश महाजनांना झाप-झाप झापले ,VIDEO होतोय तुफान व्हायरल
राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कथित भेट विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. विशेषतः मध्यरात्री २ वाजता ही भेट झाल्याचा दावा समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना वेग आला.
प्रकाश आंबेडकर यांच्या ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसकडून २३ एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये “उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री सुमारे २ वाजता मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे भेट दिली,” असा दावा करण्यात आला होता.
भारताकडे येणारे जहाज होर्मुझमधून इराणकडे घेऊन गेले
मात्र, या सर्व चर्चांवर भाजपकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी हा दावा फेटाळून लावत सांगितले की, “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कोणतीही भेट झालेली नाही.
अशा प्रकारची बातमी पूर्णपणे खोटी आहे.” या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सोशल मीडियावर पसरलेल्या दाव्यांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत ‘प्रबुद्ध भारत’ या मिडिया हाऊसकडून दावा करण्यात आला आहे,
यावर हर्षवर्धन सपकाळ यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. ही अफवा आहे, या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.
या प्रकरणात त्याची शहानिशा झाल्याशिवाय त्यावर बोलणं उचित ठरणार नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान संजय गायकवाड यांनी शिविगाळ प्रकरणात दिलिगीरी व्यक्त केली आहे. या प्रकरणाकडे कसं पहाता असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आलं.
यावर बोलताना त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्यांनी माफी मागितलेली नाही, आणि त्यांनी जी दिलिगीरी व्यक्त केली आहे,
ती त्यांनी कशा संदर्भात व्यक्त केली त्याचा खुलासा देखील या ठिकाणी होणं आवश्यक आहे. त्यांनी अतिशय अश्लील भाषेत शिव्या दिल्या, त्यानंतर त्यांनी कुठंतरी ब्रह्मण समाजावर जातिवाचक टिपणी केली.
वारकरी संप्रदायातील जे संत आहेत ते वाईट भावनेतून, मुली पळवण्याच्या भावनेतून सप्ताहाला जातात, इथपर्यं त्यांची विधानं आहेत, ही सर्व विधानं आपण पाहिलीत तर अशा व्यक्तीवर कारवाई होणं गरजेचं आहे, असं यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरमध्ये दखल झाले. दर्शनानंतर गोदा ते नर्मदा जल यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमाला फडणवीस उपस्थिती लावणार आहेत.
त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “असं आहे की, उद्धव ठाकरे यांना जर माझ्याशी बोलायचे असेल अथवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही.
ती उघडपणे होऊ शकते. असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत, की जे लपवण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोकं जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देतात.
या खोटारड्या हँडल्सला नोटीस बजावण्यात येईल.” असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री भेट झाल्याचे वृत्त खोटं असल्याचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे. या भेटीवर आता पडदा पडला आहे.








